ठाणे जिल्ह्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून ४४९० नागरिकांची तपासणी; २३७ संशयित रुग्णांची नोंद


ठाणे जिल्ह्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून ४४९० नागरिकांची तपासणी; २३७ संशयित रुग्णांची नोंद.

(जिल्हा परिषद, ठाणे) – ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार व सहजसुलभ करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबवली जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात कर्करोग मोबाइल व्हॅन कार्यरत असून, नागरिकांना कर्करोग तपासणीसाठी सुविधा उपलब्ध होत आहे.

      जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्हॅनचे प्रभावीपणे संचालन केले जात आहे.

      जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोबाइल व्हॅनद्वारे मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग यांसारख्या प्रमुख कर्करोगांची तपासणी केली जात आहे. ही व्हॅन आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून, ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना प्राथमिक तपासणीसाठी रुग्णालयात न जाता त्यांच्या परिसरातच ही सेवा मिळते.

      फेब्रुवारी २०२५ व मे २०२५ या दोन महिन्यातील कालावधीत एकूण ४४९० नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये २३७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या संशयित रुग्णांना पुढील निदान व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठविण्यात आले आहे.      कर्करोग हा असंसर्गजन्य आजार असून त्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. परंतु वेळीच निदान झाल्यास योग्य उपचाराद्वारे रुग्णाचे आयुष्य वाचवता येते. याकरिता कर्करोग मोबाइल व्हॅन उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
000
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र