लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे अभिवादन कार्यक्रम
(जिल्हा परिषद, ठाणे) – जिल्हा परिषद, ठाणे येथे लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती दि. ०१ ऑगस्ट, २०२५ रोजी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सामाजिक न्याय, समता व संघर्षाचे प्रतीक असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

             या प्रसंगी जिल्हा परिषद ठाणेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, कार्यकारी अभियंता प्रकाश सासे तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

             अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या क्रांतिकारी साहित्याच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाच्या व्यथा व वेदना शब्दबद्ध करून सामाजिक परिवर्तनाची मशाल पेटवली. त्यांच्या लेखणीतून फुललेले लोककथांचे पात्र, “फकिरा” सारखी कादंबरी आजही प्रेरणादायी आहे.

             या प्रसंगी उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या विचारांची उजळणी करत, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समता व न्यायाच्या मूल्यासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प केला. त्यांच्या साहित्य व समाजसुधारणेतील योगदानाचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्यातर्फे करण्यात आले.

टिप्पणियाँ
Popular posts
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र