खोणी ग्रामपंचायतीचा कोटी घोटाळा! वरिष्ठ अधिकारीच मुख्य सूत्रधार? ग्रामसेवकांवर बळीचा बकरा म्हणून कारवाई!


ग्रामसेवक दोषी सरपंच निर्दोष वहारे अधिकारी ?


मुख्य आरोपी कोन बनणार ?


भिवंडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खोणी ग्रामपंचायतीत तब्बल एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. या प्रकरणी ग्रामसेवक राम मस्के यांच्यावर कारवाई करण्यात आली असली तरी, जनतेचे बोट आता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे उठले आहे.

मंजूर निधीची फसवणूक, बनावट कागदपत्रे, आणि कामांवरील अपारदर्शकता — हे सर्व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीत असतानाही दुर्लक्ष करण्यात आले, असा गंभीर आरोप नागरिक करत आहेत.
विस्तार अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, गट विकास अधिकारी आणि उच्चस्तरीय अधिकारी यांनी डोळेझाक करून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले, असा आरोप सर्रास होत आहे.

> 🗣️ “वरिष्ठ अधिकारीच या संपूर्ण रॅकेटचे सूत्रधार आहेत, आणि आता स्वतःचा बचाव करण्यासाठी ग्रामसेवकांना बळी देत आहेत!” — नागरिकांचा संतापजनक आरोप.



या घोटाळ्याची साखळी फक्त ग्रामपंचायतीपुरती मर्यादित नसून ती थेट पंचायत समितीच्या वरच्या स्तरापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे “वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी न करता फक्त खालच्या पातळीवर कारवाई करणं म्हणजे न्यायाची थट्टा आहे!” असा आरोप आता ग्रामस्थ करत आहेत.

भिवंडी तालुक्यातील जनतेचा सवाल थेट आणि ठाम —
“खरा आरोपी कोण? पैसा कोणी घेतला आणि शिक्षा कोणाला होतेय?”
या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यास भिवंडीतील ग्रामविकास विभागाचं विश्वासार्ह अस्तित्वच संपेल, अशी चर्चा जोरात रंगली आहे.
टिप्पणियाँ
Popular posts
नाप्ता साठवणुकीचा परवाना नसताना देखील मे. इंडियन ऑइल अदानी व्हेन्चर्स लिमिटेड या कंपनीचा नाप्ता साठवणुकीचा व्यवसाय चालू ?
चित्र
ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
कर्करोग निदान व्हॅन — ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चित्र
२०२५ " विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान!हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे, तर पत्रकारितेत निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक संघर्षशील पत्रकाराचा सन्मान आहे-डॉ. किशोर पाटील
चित्र