वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
• भगवानदास विश्वकर्मा (सहारा सिटी न्यूज)
मुरबाड ( मंगल डोंगरे ) : अखेर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा अनागोंदी व मनमानी कारभाराला कंटाळून, धसई टोकावडे शिरोशी परिसरातील सर्व शेतकरी, छोटे मोठे उद्योग धंद्यावले व्यावसायिक, नागरिक, शाळकरी मुलांचे पालक वर्ग यांनी धसई विद्युत कार्यालयावर मोर्चा काढला होता. गेल्या वर्षभरात विद्युत वीज कंपनीच्या मनमानी अनागोंदी कारभारा बाबत वारंवार तक्रारी अर्ज, विनंत्या व प्रत्यक्ष भेटून वीज कंपनीचा सुरू असलेल्या कारभारा बाबत सुचविले होते, तरी सुद्धा त्यात कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नसून त्यामुले जनता खूप त्रस्त झाली होती.
या त्रासाला कंटाळून धसई टोकावडे शिरोशी परिसरातील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता, वेळो वेळी वीज पुरवठा खंडित करणे, वाढीव बिले देणे, केव्हाही रात्री अपरात्री विद्युत पुरवठा खंडित करणे, कमी दाबाचा विद्युत पुरवठा करणे, लाखोंचा निधी असून सुद्धा सडलेले लोखंडी पोल व तारा, न बदलल्या, मुले, विद्युत बंद च्या नावाखाली पूर्ण दिवस विद्युत पुरवठा बंद करणे, सतत विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे, पावसाळ्याच्या दिवसात आरोग्य धोक्यात आले आहे, या रामभरोसे विद्युत कंपनी मुले शाळकरी मुलांचे तसेच शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग यांचे खूप नुकसान होतअसल्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते, या मोर्च्याचे आयोजन माजी जिल्हा परिषेदेचे सदस्य सुभाष आप्पा घरत, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते, विद्युत वितरण कंपनीच्या उप अभियंता यांना निवेदन देऊन, मोर्चा संपन्न करण्यात आला होता. या मोर्च्यासाठी हजारो शेतकरी पालक वर्ग उपस्तित होते,
जर ह्या विद्युत वितरण कंपनीचा कारभार व्यवस्थित नाही झाला तर आम्ही पुन्हा मोठे तीव्र आंदोलन करू,
सुभाष आप्पा घरत
मा. जिल्हा परिषद सदस्य ,
सर्वांच्या तक्रारीचे निवारण करून योग्य पद्धतीने विद्युत पुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घेतली जाईल, व्होलटेज ची समस्या तपासणी केली जाईल, विद्युत लाईन वर आलेली झाडे मे महिन्यात कटिंग केली जातात, परंतु पुन्हा झाडांची वाढ होते, परंतु गणेश उत्सवाच्या पूर्वी झाडांची पुन्हा कटिंग केली जाईल, वाढीव बिला बाबत चौकशी करून योग्य रीतीने दुरुस्ती केली जाईल,
**आनंद काटकर **
**विद्युत वितरण अभियंता**