भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा शुभारंभ आज (दि. ३ ऑक्टोबर) रोजी श्री मार्कंडेय महामुनी वाचनालयात मा. अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.
कार्यक्रमात ‘महाराष्ट्राची महावक्ता’ स्पर्धेची विजेती कु. संस्कृती सदानंद म्हात्रे हिचा विशेष कार्यक्रम आणि ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. एम.पी.एस.सी. व यू.पी.एस.सी. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्तांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा वारसा जपण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास नगरसेवक संतोष शेट्टी, सहाय्यक आयुक्त नितीन पाटील, वाचनालय प्रमुख सुदाम जाधव आदी उपस्थित होते.
महानगरपालिकेत ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ग्रंथदिंडी, व्याख्यानमाला व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्त अनमोल सागर (भा.प्र.से.) यांनी केले आहे.