पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
२५ लाखांच्या लाचेच्या प्रकरणात ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे एसीबीच्या सापळ्यात अटकेत!

५० लाखांची मागणी, कारवाईऐवजी भ्रष्टाचाराचा बाजार — महापालिकेत खळबळ

ठाणे | प्रतिनिधी : सुनील विश्वकर्मा

ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना एसीबीने २५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले!
या धक्कादायक कारवाईने ठाणे महानगरपालिकेत अक्षरशः भूचाल निर्माण झाला आहे.


---

⚡ बांधकाम व्यावसायिकाकडून ५० लाखांची मागणी

बांधकाम व्यावसायिक अभिजीत मधुकर कदम यांनी विष्णू नगर, मानपाडा परिसरातील तीन अतिक्रमित दुकाने हटवण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला होता. मात्र कारवाई झाली नाही.

नंतर तक्रारदाराची उपायुक्त पाटोळे आणि त्यांचा ‘जवळचा’ मित्र विकासक संतोष तोडकर यांच्याशी भेट घडवण्यात आली.
पाटोळे यांनी २० लाख रुपयांची मागणी कागदावर लिहूनच केली, आणि “काम पुढे न्यायचं असेल तर तोडकरांना भेटा” असं सांगितलं.

तोडकरांनी त्यानंतर सुशांत सुर्वेच्या बँक खात्यात १० लाख रुपये जमा करा असा आदेश दिला. पैसे जमा झाले तरीही कारवाई झाली नाही. पुढे पाटोळे यांनी थेट ५० लाखांची मागणी केली.


---

🚨 एसीबीचा जबरदस्त सापळा

तक्रारदाराने थेट मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
१ ऑक्टोबर रोजी एसीबीने ठाणे महापालिकेच्या आवारात सापळा रचला.
पाटोळे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर “२५ लाख गाडीत ठेवा” असा संदेश पाठवला. तक्रारदाराने पैसे ठेवताच, एक व्यक्ती आली आणि बॅग घेऊन पळाला.

एसीबीच्या पथकाने तात्काळ त्याला पकडले. चौकशीत त्याने कबूल केले — “हे पैसे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासाठीच आहेत!”
त्याच क्षणी पोलिसांनी पाटोळेंना कॉल करून “पैसे मिळाले” असे सांगायला लावले, आणि पाटोळे यांनी “ठीक आहे” असे उत्तर दिल्यावर एसीबीने कार्यालयात घुसून त्यांना अटक केली!


---

⚖️ तीघांवर गुन्हा दाखल

या प्रकरणात शंकर पाटोळे, ओंकार राम गायकर आणि सुशांत सुर्वे या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ७(अ), १२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना पुढील चौकशीसाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.


---

🔥 संतोष तोडकर आणि पाटोळे – ‘डबल इंजिन’ भ्रष्टाचार?

ठाण्यात चर्चेचा विषय ठरला आहे की, उपायुक्त पाटोळे आणि विकासक संतोष तोडकर यांचे गठजोड जाळे शहरात किती खोलवर रुजले आहे?
दोघांनी मिळून अतिक्रमणावर कारवाईच्या नावाखाली लाचखोरीचा गोरखधंदा सुरू ठेवला असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

नागरिक आणि काही समाजिक संघटनांकडून दोघांच्या मालमत्तेची व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.


-------------------------

“महापालिकेत आता केवळ अतिक्रमण नाही, भ्रष्टाचाराचं साम्राज्य उभं राहिलंय — पाटोळे त्याचा चेहरा ठरले!”
असा सूर ठाण्याच्या गल्लीबोळांत उमटताना दिसतोय.


टिप्पणियाँ
Popular posts
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
मनपा अधिकाऱ्यांचा कचरा घोटाळा उघड – नागरिकांच्या आरोग्याशी खेळ!
चित्र