शिर्डी :.स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पत्रकार हल्ला विरोधी समितीचे प्रदेशाध्यक्ष- डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांचा दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने शिर्डी येथे रविवार दिनांक
२६/१०/२०२५ रोजी साई शाल व साई मुर्ती देऊन यथोचित सन्मान केला.यावेळी त्यांच्यासोबत सह्याद्री नागरी पतसंस्थेचे संचालक डॉ.श्री प्रमोद मारुती पाटील व दैनिक स्वराज्य तोरण च्या कार्यकारी संपादिका तथा सह्याद्री नागरी पतसंस्थेच्या माणकोली शाखेच्या शाखाधिकारी सौ.संगीता किशोर पाटील उपस्थित होत्या. त्यांचाही साई शाल देऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ.श्री.विश्वासराव आरोटे व साई सबुरी नाॅव्हेल्टी स्टोर चे
मालक श्री.भागवत.जी.भोर यांनी यथोचित सन्मान केला.