२०२५ " विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान!हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे, तर पत्रकारितेत निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक संघर्षशील पत्रकाराचा सन्मान आहे-डॉ. किशोर पाटील
हिंद भुमी टाईम्सच्या वतीने संपादक डॉ. किशोर पाटील यांना ‘" स
भिवंडी : हिंद भुमी टाईम्सचे संपादक तथा समाजसेवक श्री. यूसुफ मन्सूरी यांच्या वतीने भिवंडी शहर व विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी 
भिवंडी शहरातील धामणकर नाका येथील स्कॉलर इंग्लिश हायस्कूल च्या भव्य प्रांगणात बुधवार दिनांक १५ /१०/२०२५ रोजी एका भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन भारताचे माजी राष्ट्रपती भारत रत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने करण्यात आले होते. त्यामुळे त्या पुरस्कार सोहळ्याला डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम ‘" सच्चा रत्न पुरस्कार २०२५ " असे नाव देण्यात आले होते. या कार्यक्रमात दै. स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांना डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम
‘" सच्चा रत्न पुरस्कार २०२५ " विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
मराठी पत्रकारितेतील वैचारिक स्पष्टता, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालवणारे दैनिक ‘स्वराज्य तोरण’ चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, दुर्लक्षित समाजघटक, तसेच सामान्यांच्या प्रश्नांना आपल्या परखड लेखणीद्वारे वाचा फोडली आहे. सामाजिक अंलबजावणी, शासकीय योजनांची कार्यवाही, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि राजकीय धोरणांवरील अभ्यासपूर्ण भाष्य ही त्यांच्या पत्रकारितेची ठळक वैशिष्ट्ये ठरली आहेत.
दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक म्हणून त्यांनी केवळ वृत्तसंपादनच नाही, तर समाजप्रबोधनाचे कार्यही सातत्याने केले आहे. त्यांची लेखनशैली ठाम, समतोल आणि सुस्पष्ट असून, वाचकांमध्ये विचारप्रवृत्त करणारी आहे. या गुणवत्तेचीच दखल घेत त्यांना 
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम ‘" सच्चा रत्न पुरस्कार २०२५ "
 देण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश म्हणजे विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या व्यक्तींना लोकांसमोर आणणे व त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करून नव्या पिढीला समाजसेवेची दिशा देणे हा होता. डॉक्टर, पोलीस, पत्रकार, शिक्षक, वकील आदी क्षेत्रांतील व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याला व्यासपीठ मिळवून देणे हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी, राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा (भैय्याजी), निर्देशक, mamfdc महाराष्ट्र सरकार सलीम सारंग, सेवानिवृत्त न्यायाधीश पुणे ए.बी.तहसीलदार, cwc वक्फ डेवलपमेंट कमिटी सदस्य भारत सरकार वसीम खान, राष्ट्रीवादी कांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट शोएब खान गुड्डू , समाज सेवक लतीफ बाबा, आदी मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
पत्रकारितेच्या क्षेत्रात निष्ठा, सत्यता आणि समाजहिताच्या भावनेतून सातत्याने काम करणाऱ्या डॉ. किशोर बळीराम पाटील यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार हे त्यांच्या दीर्घकालीन पत्रकारितेच्या कार्याचे उत्तम फलित असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात पत्रकार क्षेत्रातील अन्य मान्यवरांचीही उपस्थिती उल्लेखनीय होती. 
या प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन पत्रकार यूसुफ मन्सूरी यांनी केले होते. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सज्जाद अख्तर यांनी सुरेखपणे पार पाडले.
संपूर्ण कार्यक्रमात सन्मानार्थी व उपस्थित मान्यवरांमध्ये उत्साह, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण होते. डॉ. किशोर पाटील यांच्या कार्याचा गौरव हा नव्या पत्रकारांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणारा ठरेल, असा विश्वासही यावेळी अनेकांनी व्यक्त केला.

हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे, तर ग्रामीण पत्रकारितेत निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक संघर्षशील पत्रकाराचा सन्मान आहे. सत्य व निष्पक्षतेच्या मार्गावर चालणाऱ्या पत्रकारितेची ही थोडीशी पावती आहे. यामुळे अधिक जबाबदारीची जाणीव झाली आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ. किशोर पाटील यांनी पुरस्कार स्वीकृतीवेळी दिली.
टिप्पणियाँ
Popular posts
ठाण्यातील सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने न्यूरो-नेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने चार रुग्णांना दिला "जीवनाचा आशीर्वाद", रुग्ण उपचारामध्ये मोठी क्रांती
चित्र
खोणी ग्रामपंचायतीचा कोटी घोटाळा! वरिष्ठ अधिकारीच मुख्य सूत्रधार? ग्रामसेवकांवर बळीचा बकरा म्हणून कारवाई!
चित्र
छात्रों को वापस महाराष्ट्र में लाने की कोशिश ,आखिर रेलवे ने सांसद शिंदे की मांग को स्वीकारा ।
चित्र
जिल्हा परिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात
चित्र
दैनिक ‘स्वराज्य तोरण’ का 17वां वर्धापनदिन उत्साहपूर्वक संपन्न; पत्रकारों को हेलमेट एवं मिठाई प्रदान कर दिया गया सुरक्षा और एकता का संदेश
चित्र