कल्याणमध्ये फेरीवाल्यांवरील कारवाईत हलगर्जीपणा, २ अधिकारी, १ कर्मचारी निलंबित… कल्याण :- कल्याण (प) आणि डोंबिवली (पू) येथील

कल्याणमध्ये फेरीवाल्यांवरील कारवाईत हलगर्जीपणा, २ अधिकारी, १ कर्मचारी निलंबित…


कल्याण :- कल्याण (प) आणि डोंबिवली (पू) येथील स्कायवॉक वरील फेरीवाल्यांवरील कारवाईत हलगर्जीपणा केल्यामुळे २ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांसह १ कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हि कारवाई केली.
निलंबित करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे नाव १) दिपक शिंदे – फ प्रभागक्षेत्र अधिकारी २) भारत पवार – क प्रभाग क्षेत्र अधिकारी ३) गणेश माने – कर्मचारी अशी आहेत. सदर बाबत आयुक्तांनी साध्या वेशात स्कायवॉक वर जाऊन पाहणी केली आणि अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्या जाणून घेतल्या,
तसेच नागरिकांनी तक्रार दाखल करूनही संबंधित अधिकारी कारवाई करत नसल्याचे समोर आल्याने, संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, यापुढे स्कायवॉक वरती कुठलाही फेरीवाला बसणार नसल्याची खबरदारी आयुक्त घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र