कल्याण डोंबिवलीचे महापालिकेचे एक्झिकिटीव्ह इंजिनिअर बाळासाहेब जाधव यांना अँटीकरप्शनने लाच घेताना केली अटक  कल्याण  :-मुख्यालयात नवनियुक्त मनपा आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी हे रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच पुन्हा एकदा मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पोलखोल समोर आले आहे.कल्याण – डोंबिवली महापालिकेचे एक्झिकिटीव्ह इंजिनिअर ( जल

कल्याण डोंबिवलीचे महापालिकेचे एक्झिकिटीव्ह इंजिनिअर बाळासाहेब जाधव यांना अँटीकरप्शनने लाच घेताना केली अटक 
कल्याण  :-मुख्यालयात नवनियुक्त मनपा आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी हे रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच पुन्हा एकदा मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पोलखोल समोर आले आहे.कल्याण – डोंबिवली महापालिकेचे एक्झिकिटीव्ह इंजिनिअर ( जल निसारण / मलनिसारण) बाळासाहेब जाधव यांना अँटीकरप्शनने एका महिलेकडून १५ हजार रुपये लाच घेताना अटक केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना १७ फेब्रुवारी संध्याकाळी मनपा कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात घडली आहे..अधिक तपास सुरू आहे.
मनपा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनपा शौचालयाच्या कामासाठी एका ठेकेदार महिलाने ८ लाखाचे सफाई ठेका घेतले होते त्या कामाचे बिल मनपा कायरकारि अभियंता बाळा साहेब जाधव यांच्या स्वाक्षरीने तिला मिळणार होते;परंतु ते बिल काढण्यासाठी बाळासाहेब जाधव यांनी त्या ठेकेदार महिलेकडे २% हिसाबने १६ हजारांची पाच मागितली होती अखेर १५ हजार मध्ये सौदा पक्का झाला होता..त्या महिलांकडून दिलेल्या तक्रारीवरून लाच लुपत अधिकाऱयांनी सापळा रचून मनपाच्या मुख्यालयात तळ मजल्यावरच १५ हजार रोख रक्कम स्वीकारताना लाच लुचपत अधिकाऱ्यानी मनपाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब जाधव यांना प्रत्यक्षदर्शी अटक केले .


टिप्पणियाँ
Popular posts
नाप्ता साठवणुकीचा परवाना नसताना देखील मे. इंडियन ऑइल अदानी व्हेन्चर्स लिमिटेड या कंपनीचा नाप्ता साठवणुकीचा व्यवसाय चालू ?
चित्र
ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
कर्करोग निदान व्हॅन — ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चित्र
२०२५ " विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान!हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे, तर पत्रकारितेत निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक संघर्षशील पत्रकाराचा सन्मान आहे-डॉ. किशोर पाटील
चित्र