शिकारी झाले जेरबंद, शिकार केलेले रानडुक्कर वनविभागाने घेतले ताब्यात,मुख्य आरोपी फरार
भिवंडी: संपूर्ण देशात लोकडाऊन च्या छायेत असताना व राज्यभरात संचारबंदी,जमावबंदी लागू असताना भिवंडी तालुक्यातील सागाव-देवचोळे येथील शासकीय वनात शिकारी साठी गेलेल्या समूहापैकी दोन शिकारी पकडण्यात पडघा वनविभागास यश आलेले आहे तर असून रानडुक्कराची केलेली शिकार जागेवर सोडून इतर शिकारी पळ काढण्यात यशस्वी झालेले आहे तसेच वनविभाग त्यांच्या मार्गात आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता ना त्यांना 25 एप्रिल पर्यंत 5 दिवसांची फॉरेस्ट कस्टडी मिळाली असून उपवनसंरक्षक ठाणे डॉ.रामगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.वनसंरक्षक बी टी कोळेकर, व वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे, अधिक तपास करीत आहेत.सदर कारवाईत पडघा वनपरिक्षेत्रातील वनपाल अशोक काटेसकर,आर एन गोरले,जे जी भोईर वनरक्षक अजय राठोड,अमित कुलकर्णी,शरद म्हाडा विनोद सिलवेरी हे उपस्थित होते. या कारवाईने वनविभागाने शिकाऱ्यांभोवती आपला फास अधिकच आवळला असून त्यामुळे परिसरातील सराईत शिकारी यांचे धाबे दणाणले आहे. मुक्या वन्यप्राण्यांना आता त्यांच्या आश्रयस्थानात मुक्त संचार करता येणे शक्य आहे.
सध्या कोरोंना विषाणू ने जगभरात थैमान घातलेले असताना विविध देशातील वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीच्या ठिकाणी सहज मुक्त संचार करतानाचे दृश्ये , व्हिडिओज वायरल होत आहेत. भारतातील जंगले विशेषत: महाराष्ट्रातील जंगले ही वैविध्यपूर्ण पक्षी,प्राणी, वृक्षसंपदेंने संपन्न असून वनविभाग व पक्षीमित्र प्राणीमित्र यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आतापर्यंत या वनसंपदेत उल्लेखनीय वाढ झालेली आहे.परंतु सध्या लॉक डाउन च्या मांस मच्छी यांचा तुटवडा असल्याने तसेच आपली शिकारीची हौस भागवण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्ह्यातील अनेक आदिवासी भागात स्थानिक आदिवासी यांना हाताशी धरून बिगर आदिवासी लोक मोर,ससे,भेकर,लावरी,रानडुक्कर ई. वन्यजीवांच्या शिकारीसाठी सापळे,फास लावताना दिसून येतात, अनेकदा शिकारीसाठी जंगलांना आगी लावल्या जातात आणि त्याची परिणती मोठ्या वणव्यात होऊन सर्व जंगले खाक होऊन जातात. एक छोटी शिकार करण्यासाठी शिकारी संपूर्ण जंगल पेटवून वनसंपदेचे अतोनात नुकसान करतात,यासाठी वनविभाग गावपातळीवर जाऊन ग्रामस्थांचे प्रबोधन करून आशा प्रकारांना अटकाव करण्याचा प्रयत्न करत आहे,परंतु लोकांची विकृत मानसिकता जंगलाच्या ऱ्हासास कारणीभुत ठरत आहे.
सध्या लॉकडाऊन मुळे अत्यंत कमी कर्मचारी उपस्थिती असताना वनगुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे जिकिरीचे असतानाही वनविभाग जीवावर उदार होऊन राष्ट्रीय वनसंपतीचे रक्षण करताना दिसून येत आहेत. ही कार्यवाही पाडघा वनविभागा मार्फत करण्यात आली.