डॉ.नितीन पाटील व  डॉ.दिपाली पाटील यांच्या वतीने वळ,वळपाडा गावातील सर्व नागरिकांना मोफत गोळ्यांचे वाटप!

डॉ.नितीन पाटील व  डॉ.दिपाली पाटील यांच्या वतीने वळ,वळपाडा गावातील सर्व नागरिकांना मोफत गोळ्यांचे वाटप




भिवंडी :तालुक्यातील सर्व गुण संपन्न असणाऱ्या वळ ग्रामपंचायत हद्दीतील वळ गाव व कैलास नगर वळपाडा गावातील सर्व नागरिकांना शुश्रूषा हॉस्पिटल चे डॉ.नितीन नारायण पाटील व डॉ.सौ. दिपाली नितीन पाटील यांच्या वतीने कोविड १९ या रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे त्याच प्रमाणे शहर व ग्रामीण भागात ही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे .त्यामुळे या रोगांवर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी 
होमिओपॅथी मेडीसन  गोळ्यांचे मोफत वाटप या डॉक्टर दाम्पत्यांन कडून शुक्रवार दिनांक१५/०५/२०२० रोजी करण्यात आले.
आर्सेनिक अल्बम ३० ही गोळी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.त्यामुळे कोरोना रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी या गोळ्यांचा उपयोग होऊ शकतो. सदर रोगाची लक्षणे ही हवेतील विषाणू  पासून शरीरात प्रवेश करतात.मात्र सदर रोग हा सर्वांना होईल असे नाही .तरी पण आपण आपल्या सर्वांचे आरोग्य  निरोगी राहण्यासाठी या गोळ्या फक्त तीन दिवस सकाळी उपाशी पोटी घेणे गरजेचे आहे लहान मुलांना ४ गोळ्या तर मोठ्या माणसांना ६ गोळ्या घेणे गरजेचे आहे.या गोळ्यापासून आपणाला कोणताही इफे्ट्स होणार नाही. उदा.लिंबू सरबत, चवणप्राश हे जस आपण पितो त्याच प्रमाणे या गोळ्या आहेत. सदर मेडीसिन हे आयुष मंत्रालयाने शोधून काढले आहे.व यांच्या सौजन्याने होमिओपॅथी,आयुर्वेदिक,युनानी,हे मेडीसिन सुरू आहेत.सध्या केरळ व महाराष्ट्रात  या गोळ्या सुरू करण्यात आल्या आहेत.अशी माहिती यावेळी डॉ.सौ.दिपाली नितीन पाटील यांनी दिली. सदर प्रसंगी कैलास नगर वळ पाडा गावातील पोलिस पाटील डॉ.सौ.सुनंदा अशोक पाटील,उपसरपंच श्री.राजन मढवी, माजी गटशिक्षण अधिकारी श्री.एन.डी.पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री.भास्कर पाटील,समाजसेवक श्री.चंद्रकांत भोईर,समाजसेवक श्री.अरुण भामरे,समाजसेवक श्री.योगेश भोईर,समाजसेवक श्री.अशोक पाटील व ग्रामंपचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


टिप्पणियाँ
Popular posts
जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ मार्गदर्शन कार्यशाळा
चित्र
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे अभिवादन कार्यक्रम
चित्र
नवजात बाळांच्या स्वागतासाठी आगळीवेगळी संकल्पना; 'इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स' कडून पर्यावरण रक्षणाचा संदेश
चित्र
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची पाच वर्षे पूर्ण; समावेशित शिक्षणासाठी विशेष वैद्यकीय तपासणी शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे यशस्वीपणे संपन्न
जिल्हा परिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात
चित्र