*मान्सून पूर्व दक्षतेसाठी भूमिगत नाल्यांच्या कामाला सुरुवात* *युवक जिल्हाध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांच्या प्रयत्नांना यश* *४ ठिकाणी टाकण्यात येत आहेत जलवाहिन्या* प्रमोद कुमार डोंबिवली :- पावसाळ्यामध्ये पाणी साठून होणारे अपघात रोखण्यासाठी कल्याण शिळ मार्गावरील गोळवली हद्दीतील नेकणीपाडा, मयुर हॉटेल समोरील गोळवली-दावडी नाका, मुख्य गोळवली प्रवेशद्वार, पांडुरंगवाडी चंद्रहास हॉटेल आशा ४ ठिकाणी गोळवली परिसरात मध्ये मोठी सांडपाण्याचा निचरा होणारी वाहिनी टाकून मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या कामाला कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांच्या पाठपुराव्याने सुरुवात करण्यात आली. २०१२ मध्ये आलिया शेख या मुलीचा अशाच एका घटनेत अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तेव्हापासून सुधीर पाटील हे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्यानंतर आता येथे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठी वाहिनी टाकण्याचे काम या ४ ठिकाणी सुरू करण्यात आले असून त्यामुळे येथील हजारो नागरिकांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना, शेकडो व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात हे काम पूर्ण झाल्यास त्याचा लाभ येथील रहिवाशांना होणार आहे. याबद्दल परिसरातील नागरिकांनी सुधीर पाटील यांचे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येऊन आभार व समाधान व्यक्त केले. परंतु हे काम माझे कर्तव्य असून मी सातत्याने नागरिकांच्या हितावहत कार्यरत राहील. त्यामुळे या कामाचा पाठपुरावा केल्यानंतर आता दिलेल्या अवधीमध्ये त्याची पूर्तता होणे यावर माझा भर असेल असे याप्रसंगी सुधीर वंडारशेठ पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी भीम पाटील, किसन गायकर, गुरुनाथ कडव, सुजित पाटील, गुरुनाथ गायकर आदी उपस्थित होते.


टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र