दयानंद चोरघे यांच्या वतीने पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
भिवंडी:महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या माध्यमातून व डी. वाय फाऊंडेशन चे स्वांस्थापक अध्यक्ष दयानंद चोरघें यांच्या वतीने पत्रकारांना अन्नधान्याचे व वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.दैनिक स्वराज्य तोरण च्या कार्यकारी संपादिका
संगिता किशोर पाटील यांच्या वाढदवसानिमित्त स्वराज्य तोरण कार्यालयात करण्यात आल्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी पंचायत समितीचे सदस्य श्री विकास अनंत भोईर,कैलास नगर वळ पाडा गावच्या पोलिस पाटील डॉ.सुनंदा अशोक पाटील , तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर पाटील,स्वराज्य तोरण सदस्य अशोक पाटील,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य तसेच इतर पत्रकार उपस्थित होते.
.