भिवंडी : कोरोना विषाणुचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या आपल्या राज्यात संचारबंदी लागु केली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरा बरोबर ग्रामीण भागातील पत्रकार देखील अत्यावश्यक सेवेतील नागरीकांप्रमाणे दिवसरात्र मेहनत घेत आहेत. जीवावर उदार होऊन पत्रकार कोरोना बाबत आपल जीव धोक्यात टाकून वृत्तांकन करत आहेत. व आपले कर्तव्य पार पाडत आहेत. पत्रकारांना देखील आपल्या स्वतःचे घर आहे. परिवार आहे म्हणून परिस्थितीचे व पत्रकारांचे गांभीर्य लक्षात घेता. भिवंडी पत्रकार संघातर्फे भिवंडी शहर, व ग्रामीण भागातील जीवनावश्यक वस्तूंचे किट भिवंडी पंचायत समिती सभागृहात नुकतेच वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम भिवंडी पत्रकार संघाने केला.त्यामुळे पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचे आभार उपस्थित सर्व पत्रकार बाधवानी मानले जीवनावश्यक वस्तूंचे पत्रकारांना वाटप करून भिवंडी पत्रकार संघाने पत्रकारांना दिलासा दिला आहे. यावेळी माक्स बांधून व सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळण्यात आले. यावेळी भिवंडी पत्रकार संघाच्या अध्यक्ष कुसुम ताई देशमुख, सचिव, रतनकुमार तेजे ,ज्येष्ट पत्रकार पंढरी कुंभार , शरद भसाळे, संध्या ताई पवार , भिवंडी निजामपूर शहर महानगपालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री.मिलिंद पळसुले, दिपक हिरे,व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. लॉकडाऊन परिस्थितीत सद्या पत्रकारांवर देखील आर्थिक संकट आलं आहे. पत्रकार हा समाजाचा केंद्रबिंदू आहे. म्हणून त्याचे देखील आपण विचार करायला हवे म्हणून भिवंडी पत्रकार संघाच्या वतीने भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सुखाचे घास भरण्याच काम आम्ही केलं आहे. असे भिवंडी पत्रकार संघाच्या अध्यक्ष कुसुम देशमुख यांनी सहारा सिटी न्यूज़ शि बोलताना सांगितले.


टिप्पणियाँ
Popular posts
जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ मार्गदर्शन कार्यशाळा
चित्र
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे अभिवादन कार्यक्रम
चित्र
नवजात बाळांच्या स्वागतासाठी आगळीवेगळी संकल्पना; 'इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स' कडून पर्यावरण रक्षणाचा संदेश
चित्र
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची पाच वर्षे पूर्ण; समावेशित शिक्षणासाठी विशेष वैद्यकीय तपासणी शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे यशस्वीपणे संपन्न
जिल्हा परिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात
चित्र