रामचंद्र देसले यांच्या वतीने पत्रकारांना आर्थिक मदतीचा हात!तर सोन्या पाटील व मनिष कराळे यांच्या वतीने पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

रामचंद्र देसले यांच्या वतीने पत्रकारांना आर्थिक मदतीचा हात!तर सोन्या पाटील व मनिष कराळे यांच्या वतीने पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


पत्रकारही अत्यावश्यक सेवेचा एक भाग आहे त्यामुळे त्यांनाही सहकार्य करा,: किशोर पाटील


भिवंडी:महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ भिवंडी शहर महानगर क्षेत्र यांच्या माध्यमातून पडघा भोकरी गावाचे सामाजिक कार्यकर्ते श्री.रामचंद्र शांताराम देसले यांच्या वतीने पत्रकारांना आर्थिक मदतीचा हात पुढे आला तर धर्मसेवक तथा समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री  सोन्या काशिनाथ पाटील यांच्या कडून पाच किलो कांदे वाटप करण्यात आले तर कोन गावाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. मनिष बाळाराम  कराळे यांच्या वतीने पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  करण्यात आले पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो .त्यामुळे देशात व राज्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून थांबता थांबत नाही व अशा कठीण परिस्थितीत डॉक्टर,पोलिस,परिचारिका,बँक कर्मचारी,व ग्रामपंचायत , पंचायत समिती,जिल्हा परिषद, नगर पालिका व,महानगरपालिका, यांचे सफाई कामगार यांच्या प्रमाणेच पत्रकारही  अत्यावश्यक सेवा करत आहेत म्हणून अशा गरीब,गरजू पत्रकारांना  अन्नधान्याचे व वस्तूंचे किट वाटप रविवार दिनांक १०/५/२०२० रोजी दैनिक स्वराज्य तोरण च्या कार्यालयात करण्यात आले.व पत्रकारही अत्यावश्यक सेवेचा एक भाग आहे म्हणून त्यांनाही सर्वांनी सहकार्य करावे असे पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा संपादक श्री किशोर पाटील यांनी यावेळी सांगितले..
.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कैलास नगर वळ पाडा गावच्या पोलिस पाटील डॉ.सौ.सुनंदा अशोक पाटील ,संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री किशोर पाटील माजी सरपंच श्री.संजय पाटील,ग्रामपंचायत सदस्य श्री.भास्कर बाबाजी पाटील,स्वराज्य तोरण सदस्य श्री.अशोक पाटील.व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य तसेच इतर पत्रकार उपस्थित होते. .डॉक्टर,पोलिस,परिचारिका,बँक कर्मचारी,व ग्रामपंचायत , पंचायत समिती,जिल्हा परिषद, नगर पालिका व,महानगरपालिका, यांचे सफाई कामगार यांच्या प्रमाणेच पत्रकारही  अत्यावश्यक सेवा करत आहेत.मात्र त्यांच्या कडे काही ठरावीक समाजसेवक व लोकप्रतनिधींनी मदतीचा हात पुढे केला आहे.त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मनापासून आभार मानतो.व  यापुढेही  काही मदत  आपल्याला इतर स्वांस्थाकडून मिळेनार आहे ती मिळाली की आपणाला कळविले जाईल.पुन्हा मी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे मनापासून आभार मानतो व यापुढेही त्यांनी असेच सहकार्य करावे हि सदिच्छा व्यक्त करतो.असे दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री किशोर बळीराम पाटील यांनी यावेळी सांगितले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.व  सर्वांचे  आभार आचार्य श्री.सुरज पाल यादव यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मानले.



टिप्पणियाँ
Popular posts
नाप्ता साठवणुकीचा परवाना नसताना देखील मे. इंडियन ऑइल अदानी व्हेन्चर्स लिमिटेड या कंपनीचा नाप्ता साठवणुकीचा व्यवसाय चालू ?
चित्र
ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
कर्करोग निदान व्हॅन — ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चित्र
२०२५ " विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान!हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे, तर पत्रकारितेत निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक संघर्षशील पत्रकाराचा सन्मान आहे-डॉ. किशोर पाटील
चित्र