नालेसफाईचे काम असमधानकारक निदर्शनास आले तर ठेकेदाराचे बिल रोखू - स्थायी समिति सभापतींचा इशारा
नालेसफाईचे काम असमधानकारक निदर्शनास आले तर ठेकेदाराचे बिल रोखू - स्थायी समिति सभापतींचा इशारा
कल्याण - अभिजित देशमुख : नाले सफाईचे काम असमाधानकारक आढळून आल्यास संबंधित कंत्रटदाराच्या विरोधात कारवाई केली जाईल. तसेच संबंधित ठेकेदाराचे बिल रोखण्यात येईल असा इशारा स्थायी समिति सभापती विकास म्हात्रे यानी दिला . स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यानी नालेसफाईच्या कामबाबत आक्षेप घेतल्यानंतर आज सभापतीं म्हात्रे यानी नालेसफाई च्या कामाची पाहणी
केली .
पावसाळ्यच्या पार्श्वभूमिवर शहरात कुठेही पाणी साचू नये यासाठी नालेसफाईच्या कामाला प्राधान्य दिले जाते. कोरोनाच्या काळातही सभापती म्हात्रे यांनी समितीची सभा घेऊन नालेसफाईच्या कामाला मंजूरी दिली होती. शहरातील लहान मोठय़ा आकाराचे 96 नाले पावसाळ्य़ापूर्वी साफ करण्यात येणार आहेत. त्याकरीता 3 कोटी 60 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. नालेसफाईच्या कामालास दहा दिवसापूर्वीच सुरुवात झाली असून जवळपास 60 टक्के पेक्षा जास्त काम पूर्ण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे . आज पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत नालेसफाईच्या कामावर सदस्यांनी आक्षेप घेतला . सभा संपताच सभापती म्हात्रे यांनी नाले सफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन खरोखरच नाल्यातील गाळ काढण्यात आला आहे की नाही. हे प्रत्येक नाल्याच्या ठिकाणी जाऊन जाणून घेतले.यावेळी त्यांच्यासोबत जल निस्सारण विभागाचे अभियंता बबन बरफ उपस्थित होते .या पाहणी दौऱ्या दरम्यान नाले सफाईच्या पाहणी दरम्यान काम असमाधानकारक आढळून आल्यास संबंधित कंत्रटदाराच्या विरोधात कारवाई केली जाईल. तसेच संबंधित ठेकेदाराचे बिल रोखण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.