भिवंडी शहरातील कापआळी इथं राहणाऱ्या दीप्ति देशमुख यांचे इंडीया बुक ऑफ रेकॉर्डस आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नाव शामील.
भिवंडी : भिवंडी शहरातील कापआळी इथं राहणाऱ्या दीप्ती माधव देशमुख ह्या गेल्या २६ वर्षा पासून रस्त्यावरील भटक्या प्राण्यांसाठी काम करीत आहेत. त्यांच्या खाण्याची सोय करीत असतात त्याच प्रमाणे प्राणी आजारी असल्यावर त्याच्यावर निःशुल्क उपचार करतात. दररोज सुमारे ३००-३५० कुत्र्यांना पोट भरावे म्हणून बिस्किट्स देतात. त्यांना गरजू प्राणी पक्षाच्या इलाजासाठी कोणी कितीही वाजता कॉल केला तर त्या ठिकाणी पोहोचून निःशुल्क इलाज करतात.
दीप्ती देशमुख या पथोलॉजिस्ट व योगा शिक्षक आहेत.
त्यांनी आत्ता पर्यंत २०,००० च्या वर या मुक्या भटक्या प्राण्यांचा त्यात कुत्रा, मांजर, कबुतर,सफेद उंदीर,गरुड,गाढव, बकरी इत्यादी वर निःशुल्क उपचार करून त्यांचा जीव वाचविला आहे. भटक्या मुक्या जनावरांसाठी केलेल्या कार्याची दखल इंडीया बुक ऑफ रेकॉर्डस आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली व त्यामध्ये दीप्ती माधव देशमुख यांचे नाव सामिल केले आहे. त्या संबंधी पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता BMPA हॉल, धामणकर नाका, भिवंडी येथे आयोजित करण्यात आला आहे...