रसायनाच्या गोदामाला लागलेली आग २ तासांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात
रसायनाच्या गोदामाला लागलेली आग २ तासांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात

ही आग एवढी भीषण होती, की या आगीचे लोट परिसरात पसरून नागरिकांचे डोळे चुरचुरत होते. तर घशाला त्रास होत असल्याचे काहींनी सांगितले.

कल्याण/प्रमोद कुमार - भिवंडीप्रमाणाचे कल्याण-डोंबिवलीतही आगीचे सत्र सुरू असून आज सकाळच्या सुमारास एका रसायनाच्या गोदामाला अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील उसरघर परिसरातील रूनवॉल फेज दोनमधील कामगार वसाहत लगत असलेल्या रसायन गोदामात घडली आहे.

ज्वालाग्राही रसायनामुळे अग्नीचे रौद्ररूप

ही आग एवढी भीषण होती, की या आगीचे लोट परिसरात पसरून नागरिकांचे डोळे चुरचुरत होते. तर घशाला त्रास होत असल्याचे काहींनी सांगितले. या आगीची घटना कल्याण-डोंबिवली अग्निशामक दलाच्या कार्यालयात मिळताच घटनस्थळी अग्निशामकचे जवान गाड्यासह दाखल होऊन ही आग २ तासाच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. मात्र रसायनाच्या गोदामात असलेल्या काही ज्वालाग्राही घातक रसायनामुळे अग्नीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत लाखो रुपयांचे रसायनांचे ड्रम जळून खाक झाले, अशी माहिती अग्निशामक अधिकारी दत्तात्रय शेळके यांनी दिली.

यापूर्वीही घडली भीषण आगीची घटना

डोंबिवली एमआयडीसीमध्ये मानवी औषधावर संशोधन करणाऱ्या एका सेंटरला गेल्या २७ जानेवारी रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली होती. यात कोट्यवधी रुपयांचा माल भस्मसात झाला होता. विशेष म्हणजे या दुर्घटनेत 38 संशोधक थोडक्यात बचावले. एमआयडीसी फेज 1मधील ए 37/38 या ठिकाणी कॅलेक्स फार्मस्यूटीकल रिसर्च सेंटर या मानवी औषध बनण्याच्या आधी तयार होणाऱ्या औषधावर संशोधन करणारे सेंटर होते.
टिप्पणियाँ
Popular posts
नाप्ता साठवणुकीचा परवाना नसताना देखील मे. इंडियन ऑइल अदानी व्हेन्चर्स लिमिटेड या कंपनीचा नाप्ता साठवणुकीचा व्यवसाय चालू ?
चित्र
ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
कर्करोग निदान व्हॅन — ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चित्र
२०२५ " विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान!हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे, तर पत्रकारितेत निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक संघर्षशील पत्रकाराचा सन्मान आहे-डॉ. किशोर पाटील
चित्र