उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा..
मुंबई, दि.२५ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. जैन धर्मियांचे तीर्थंकर भगवान महावीरांनी अखिल विश्वाला मानवतेच्या कल्याणाचा विचार दिला. प्राणीमात्रांवर प्रेम, दया करायला शिकवले. विश्वकल्याणाचा ‘जगा आणि जगू द्या’ हा महामंत्र दिला. माणूस जन्माने नाही, तर कामाने मोठा बनतो, ही शिकवण देऊन समाजातील वर्णवर्चस्ववादाला तिलांजली दिली. सत्य आणि अहिंसेला समर्पित केलेले भगवान महावीर यांचे जीवन आपल्याला विचारांची समृद्धता देते. शांतता, अहिंसा, बंधुत्वाच्या माध्यमातूनच जगाचे कल्याण होऊ शकते, हा त्यांचा विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र