थकबाकी " वसुलीकडे दुर्लक्ष का केले? या बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे. सविस्तर हकीगत अशी की, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील काही अपवाद वगळता सर्वच ग्रामपंचायती सधन व श्रीमंत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न हे लाखो -करोडाच्या आसपास आहे . त्या मुळे या ग्रामपंचायती ............
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सधन समजल्या जाणाऱ्या कोपर ग्रामपंचायत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धी झोतात येत असते. नुकतेच कोपर ग्रामपंचायतिने मोठ्या प्रमाणावर कर थक बाकी असताना देखील ती वसुल न करता गावच्या विकासा साठी जिल्हा परिषद, ठाणे, जिल्हा ग्रामविकास निधी, विभागाकडून कर्ज घेतले आहे. त्यामुळे ग्रामसेवक व सरपंच यांनी " थकबाकी " वसुलीकडे दुर्लक्ष का केले? या बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे.
        सविस्तर हकीगत अशी की, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील काही अपवाद वगळता सर्वच ग्रामपंचायती सधन व श्रीमंत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न हे लाखो -करोडाच्या आसपास आहे . त्या मुळे या ग्रामपंचायती आपल्या गावचा  विकास हा येणाऱ्या करातुन तसेच शासनाच्या येणाऱ्या विविध योजनेतुन करत आहेत.मात्र कोपर ग्रामपंचायतिचे ग्रामसेवक श्री. काशिनाथ बुधा माळी व सरपंच श्री. रमेश सीताराम पाटील यांनी मात्र कर थकबाकी वसुलीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन,गावाच्या विकास कामासाठी थेट जिल्हा परिषद -ठाणे, जिल्हा ग्रामविकास निधी  विभागा कडून रू.१,२०,००००० (रुपये,एक कोटी वीस लाख मात्र) ची मागणी केली होती. मात्र त्या विभागाने रूपये, ८७,६०,००० (रुपये,सत्त्याऐंशी लाख साठ हजार) मंजूर केले.व त्यातील पहिला हप्ता रूपये, ४३,८०,००० (रुपये,त्रेचाळीस लाख ऐंशी हजार) हा देण्यातही आला आहे. हे कर्ज  गावातील बंदिस्त गटारे व समाज हॉल बांधण्यासाठी दिला आहे.
       मात्र घेतलेल्या कर्जा पेक्षा रुपये ८९,४८,३७६.(रुपये, एकूणनव्वद लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे श्याहत्तर) ही २२/१२/२०२० च्या माहिती अधिकारात थकबाकी दाखवली आहे. त्या मुळे  घेतलेल्या कर्जा पेक्षा थकबाकी जास्त आहे. जर थकबाकी वसुल केली असती तर ग्रामविकास निधीतुन कर्ज घेण्याची गरजच भासली नसती व ग्रामपंचायतिला वार्षिक वीस (20) हप्त्यात कर्ज फेडण्याची नामुश्की आली नसती. त्यामुळे थकबाकी वसुल करणे बंधनकारक असताना देखील, मात्र तसे न करता  या "थकबाकी" वसुलीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने, ग्रामसेवक व सरपंचानी असे  का केले? असा ग्रामस्थान मध्ये प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
      तसेच कोपर गावचे ग्रामसेवक. श्री. काशिनाथ माळी व सरपंच श्री. रमेश पाटील यांनी ग्रामपंचायत मुख्य फंडातून २१,६५,८०० (रूपये एकविस लाख पासष्ट हजार आठशे) व १४ व्या वित्त आयोगातून रूपये ११,०९३७२ (अकरा लाख नऊहजार तीनशे बहात्तर) खर्चून सद्या तरी गरज नसताना जलकुंभ बांधले आहे. मुख्य म्हणजे सदर जलकुंभाच्या उद,घाटनाच्याच दिवशीच जलकुंभाला गळती लागल्याने ग्रामस्थानमधून चर्चेला उधाण आले होते. व सद्याही या जलकुंभाचा वापर केला जात नसल्याने, एवढा मोठा खर्च का करण्यात आला?असे दबक्या आवाजात ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
       मुख्य म्हणजे या ग्रामसेवका विरोधात कोपर गावचे जागृत नागरिक तथा पत्रकार, श्री. अरुण पाटील यांनी मुख्य  कार्यकारी अधिकारी,व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, परिषद ठाणे व श्री. घोरपडे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती -भिवंडी, सहाय्यक गट विकास अधिकारी, तथा तक्रार निवारण अधिकारी श्री. मोहिते, व विस्तार अधिकारी श्री. राजू भोसले यांना वारंवार पत्र व्यवहार करून व प्रत्येक्षात भेटून श्री. काशिनाथ माळी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे व करत आहेत, मात्र जिल्हापरिषद, ठाणे व पंचायत समिती, भिवंडी यांच्याकडून आज पर्यंत कोणतीही ठोस जारवाई न करता श्री. माळी यांना खुले आम पाठिंबा देत असल्याचे आजपर्यंतच्या हालचाली वरुण दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व विषयात आर्थिक व्यवहार झाला तर नाही ना? असा संशय निर्माण झाला आहे.
टिप्पणियाँ
Popular posts
जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ मार्गदर्शन कार्यशाळा
चित्र
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे अभिवादन कार्यक्रम
चित्र
नवजात बाळांच्या स्वागतासाठी आगळीवेगळी संकल्पना; 'इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स' कडून पर्यावरण रक्षणाचा संदेश
चित्र
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची पाच वर्षे पूर्ण; समावेशित शिक्षणासाठी विशेष वैद्यकीय तपासणी शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे यशस्वीपणे संपन्न
जिल्हा परिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात
चित्र