भिवंडी तालुक्यातील वळ गावचे सुपुत्र उद्योगपती समाजसेवक तथा शेतकरी उन्नती मंडळाचे अध्यक्ष राजू अनंत पाटील यांचा वाढदिवस कोरोना प्रादुर्भावाने अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले आहे
१५ मे २०२१ रोजी शेतकरी उन्नती मंडळाचे अध्यक्ष नामांकित उद्योगपती समाजसेवक व वळ गावचे सुपुत्र राजू अनंत पाटील यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले आहे गेल्या वर्षीपासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने हाहाकार माजविला आहे. गेल्या वर्षी २ जानेवारी २०२० रोजी भारतात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला आणि २२ मार्च २०२० रोजी पासून भारतात लॉकडाऊन ला सुरुवात झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन जाहीर केल्याने सर्वच व्यवहार बंद पडले. यामुळे गेल्या वर्षी १५ मे २०२० रोजी होणारा राजू पाटील यांचा वाढदिवस साजरा करता आला नाही. यंदाही राज्यात ,देशात व जगभरात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसरी लाट जोरात सुरू झाली असून मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्याने यंदाही होणारा राजू पाटील यांचा ५८ वा वाढदिवस कोणताही गाजावाजा न करता अगदी साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
दरवर्षी मी माझ्या वाढदिवसानिमित्त समाजातील दुर्बल घटकांसाठी काही ना काही करण्याची माझी इच्छा असते मी अनेक वेळा विचार केला आहे जर माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर मी नक्कीच वृद्धाश्रमास भेट देईन आणि माझ्यापरीने मदत करण्याचा प्रयत्न करेन मी आत्ता पर्यंत दोन वेळा वृद्धाश्रमास भेट दिली आहे २०२० ला कोरोनाचे संकट आले त्यामुले मला वृद्धाश्रमास जाता आलं नाही म्हणून मी पंतप्रधान निधी योजने अंतर्गत २५,००० मदत केली या वर्षी सुद्धा कोरोनाचे संकट असल्यामुले मला वृद्धाश्रमात जाता आले नाही त्यामुळे मी विचार केला की लस विकत घ्यावी आणि गोरगरीब नागरिकांना द्यावी परंतु सरकार ने मोफत लसीकरण केल्यामुळे मी विचार केला की प्लाजमा शिबिर लावुया त्यासाठी मला १,२ प्लाजमा डोनर सापडले त्यामुळे तेही पूर्ण करू शकलो नाही.
त्यानंतर माझ्या शेतकरी उन्नती मंडळाच्या माध्यमाने चालणाऱ्या शाळेतील शिक्षकांनी मला फोन करून सांगितले की साहेब तुमचा वाढदिवस आपण साजरा करू त्यावर मी त्यांना सांगितले की कोरोनाचे भयंकर सावट असल्याने केंद्र सरकार व राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउन मुले तो कार्यक्रमही रद्द करण्याचे मी ठरवले नंतर मी असा विचार केला की माझा वाढदिवस 15 मेला साजरा न करता 15 जून पर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत शेळू मातेच्या कृपेने कोरोनाचे सावट कमी झाल्यास मी रक्तदान शिबिर आयोजित करून माझ्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थी असे एकूण २०० रक्तदाते रक्तदान करतील अशी मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त जाहीर करीत आहे, तसेच मला जर लस विकत मिळाली तर गोरगरीब २०० नागरीकांना लस देण्याचा माझा माणस असेल. तसेच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असतील तर माझ्या शुभेच्छा कोरोना बाधित रुग्णांना पोचवण्याचा माझा प्रयत्न असेल तसेच जे कोरोना रुग्ण आहेत त्यांना ईश्वर बळ देवो व लवकरात लवकर ते बरे व्हावेत असे शेळू माते चरणी प्रार्थना करीत आहे.
भिवंडी तालुक्यातील शेतकरी उन्नती मंडळाचे अध्यक्ष राजू अनंत पाटील यांच्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत अनेक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. काल्हेर येथे कॉलेज, आमने येथे कॉलेज सुरू केले आहेत. तसेच शेतकरी उन्नती मंडळाच्या वतीने भिवंडी तालुक्यात काल्हेर येथील परशराम धोंडू टावरे विद्यालय ,करिवली येथे प्रेमाबाई सुकऱ्या पाटील विद्यालय व आमने येथे सीताराम रामा पाटील विद्यालय सुरू आहेत.राजू पाटील हे वळगावचे रहिवाशी असून एक नामांकित उद्योगपती,दानशूर व्यक्तिमत्व, तसेच बांधकाम व्यवसाईक आहेत. . अंत्यत मनमिळाऊ त्यांचा स्वभाव असल्याने त्यांनी अनेक माणसे जोडली आहेत. राजू पाटील यांना आतापर्यंत
तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. २०१७ साली आगरी महोत्सव भिवंडी यांच्या वतीने समाज भूषण पुरस्कार, उद्योग क्षेत्रामध्ये तसेच २०२० साली आगरी महोत्सव भिवंडी मध्ये त्त्यांनाशैक्षणिक
क्षेत्राचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर ठाणे येथे त्यांना कोकण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गेल्या ६४ वर्षांमध्ये पहिल्यांदाच सलग दुसऱ्यादा अध्यक्ष पदी निवड होणारे एकमेव राजू पाटील .कारण आपल्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी दोन प्रायमरी इंग्लिश स्कुल,आमने येथे ज्युनियर कॉलेज, काल्हेर येथे सिनियर कॉलेज, सुसज्ज अशी लॅब, कम्प्युटर लॅब, भव्य इमारत उभी करून ७००० लोक बसतील असा सुसज्ज हॉल अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत.
शेतकरी उन्नती मंडळाचे सर्व संचालक, प्राचार्य, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच वळ गावच्या ग्रामस्थांनी तसेच पंचक्रोशीतून व भिवंडी तालुक्यातून राजू पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.