भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीने उभारलेले कोविड सेंटर,..पण कधी मिळणार हिरवा सिग्नल !


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयातील बेड, ऑक्सीजन ,रेडिमेसिव्हर इंजेक्शन यांचा तुटवडा व त्यातून निर्माण झालेला काळाबाजार यामुळे सर्वसामान्य कोविड रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले असताना त्यांना आधार  देण्यासाठी जिल्ह्यात ग्राम पंचायतीने उभारलेले पाहिले कोविड सेंटर म्हणून शेलार ग्रामपंचायतीने पुढाकार घेत 50 बेड चे सुसज्ज कोविड सेंटर अवघ्या 15 दिवसात ग्राम निधी व लोकसहभागा तून उभारले आहे. मात्र सुसज्ज व सर्व सोयी सुविधा असलेल्या या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाने अजूनही मान्यताच दिली नसल्याने हे सेंटर सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेत येऊ शकत नसल्याची खंत शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच अँँड. किरण चन्ने यांनी व्यक्त करीत सरकारी लालफिती बाबत नाराजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी याबाबत लक्ष देऊन तात्काळ सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.याबाबत
लेखी पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आल्याची माहिती अँड चन्ने यांनी दिली
भिवंडी तालुक्यात कोविड चा प्रादुर्भाव वाढत असल्याने रूग्णांची संख्या वाढत आहे. हॉस्पिटल मिळवण्यासाठी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे या पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच अँड. किरण चन्ने यांनी ग्रामपंचायत पातळीवर स्वतंत्र 50 बेड चे कोविड सेंटर जिल्हा परिषद शाळेत ग्रामनिधीतून उभारण्याचा निर्णय सभेत घेत कार्यवाही सुरू केली असता त्यांच्या प्रयत्नांना स्थानिक नागरिकांनी सहकार्याचा हात पुढे करीत 15 दिवसात शाळेचे रूपांतर सुसज्य कोविड सेंटर मध्ये करण्यात आले आहे. शासकीय सर्व नियमांचे पालन करीत निसर्गरम्य वातावरणात हे कोविड सेंटर उभारले आहे. कोविड सेंटर परिसरात सीसीटीव्ही केमॅरे तसेच वैद्यकीय अधिकारयांना निवासाची सोया देखील करण्यात आली आहे. तसेच रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी सुसज्य स्वयंपाक गृह देखील याठिकाणी उभारण्यात आले आहे. त्यानंतर शासकीय मंजुरीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी ,तहसीलदार यांच्या कडे पत्रव्यवहार केला गेला परंतु जिल्हाधिकारी कार्यालय कडे दिला गेलेला आरोग्य विभागाच्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे नमूद करीत जिल्हाधिकारी कार्यालयातील आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळणारे तहसीलदार तावटे यांनी परवानगी नाकारल्याने हे सेंटर तयार होऊन ही सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेत येऊ शकले नाही याची खंत अँड चन्ने यांनी दीली.हे सेंटर उभारताना लोक सहभाग सुध्दा मोठा असल्याने सर्वानाच या कामा बद्दल आस्था आहे .मात्र शुल्लक त्रुटी दाखवून परवानगी न देणे म्हणजे सर्वसामान्य गरजवंत रुग्णांच्या जीवाशी खेळण्या सारखे आहे हे स्पष्ट करीत या सेंटर साठी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, अग्नी व विद्युत यंत्रणेचे परीक्षण ग्रामपंचायतीने स्वखर्चाने करून घेत सर्व अटी शर्तींची पूर्तता केली असतानाही आरोग्य विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण दाखविले जाते हे चुकीचे असल्याचे सांगितले.
टिप्पणियाँ
Popular posts
जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ मार्गदर्शन कार्यशाळा
चित्र
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे अभिवादन कार्यक्रम
चित्र
नवजात बाळांच्या स्वागतासाठी आगळीवेगळी संकल्पना; 'इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स' कडून पर्यावरण रक्षणाचा संदेश
चित्र
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची पाच वर्षे पूर्ण; समावेशित शिक्षणासाठी विशेष वैद्यकीय तपासणी शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे यशस्वीपणे संपन्न
जिल्हा परिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात
चित्र