चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू.
आरोग्य केंद्राला सभापती कुंदन पाटील यांनी दिली भेट
भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ मार्च २०२१ पासून कोविडं-19 लसीकरणाला सुरुवात झाली आहे. काल गुरुवार दिनांक १३/०६ /२०२१.रोजी भिवंडी तालुक्यातील लाखीवली गावचे समाजसेवक व पत्रकार राजेंद्र रघुनाथ पाटील यांना लस (दुसरा डोस)देण्यात आली यावेळी के एन टावरे विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिककेत्तर कर्मचारी परिसरातील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक ,शिक्षक ग्राम पंचायत मधील कर्मचारी वर्ग, ग्राम पंचायतीचे सदस्य जेष्ठ नागरिक यांनाही लस देण्यात आली.या आगोदर मंगळबार दिनांक १६/०३/२०२१रोजी पहिला लसीचा डोस देण्यात आला होता.
या दरम्यान ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील यांनी भेट दिली होती.
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला त्याच्या काही महिन्यांपासून आजपर्यंत नागरिक कोरोना लस कधी येणार ? याची वाट पाहत होतेअखेर ८ मार्च २०२१ पासून येथील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. याची सुरुवात चिंबीपाडा आरोग्य केंद्रातुन करण्यात आली आहे .या कोविडं लसीकरणात ६०वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच ४५ वयाच्या नागरिकांना देखील ही लस देण्यात येणार आसल्याची माहिती चिंबीपाडा आरोग्य केंद्रातील डॉ.स्वप्नाली पाटील व डॉ भावना निंबार्ते यांनी दिली सी एच ओ भाग्यश्री पाटील
या लसी करणामध्ये आरोग्य सहाय्यक-सहाय्यीका,आरोग्य सेवक-सेविका, गट प्रवर्तक ,व इतर कर्मचारी आपले काम बजावत आहेत. या लसीकरणाला ८ मार्च पासून सुरुवात झाली असून सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शनिवार या दिवशी सकाळी १० ते ५ या दरम्यान लस देण्यात येईल. या प्राथमिक आरोग्य केंद्रात चिंबीपाडा, भुईशेत, पिंपलशेत, बालखडी,खडकी बु, आमराई, कुहे, धामणे, लाखीवली, पालिवली, टेंभवली,जू:नांदूरखी, शिवाजी नगर, कांबे, दह्याळे,काटई,खोनी अशी15 गावे 50 पाडे येत असून नागरिकांनी या लसीकरणामध्ये सहभागी व्हावे .तसेच डायबटीस,रक्तदाब, हायपरटेन्शन, व गंभीर आजार असणाऱ्यांनी आपली फाईल सोबत आणावी.तसेच आधार कार्ड व मोबाईल आणणे जरुरीचे आहे.कांबे उपकेंद्रा मध्ये ही लसीकरनाला सुरुवात केली आहे.
या आरोग्य केंद्राच्या परिसरातीलआशा सेविका, आंगणवाडी सेविका, शिक्षक वर्ग, ग्रामपंचायत मधील अधिकारी व कर्मचारी वर्ग, खाजगी डॉक्टर,सरकारी कार्यालयात काम करणारे कर्मचारी, जेस्ट नागरिकांना लस देण्यात येईल या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस टोचक कर्मचारी श्रीमती एस एम शिरोळे सिस्टर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.