वेश्यागमन करून बाहेर आलेल्या तरुणाने केला हवेत गोळीबार
शहरातील बदनाम गल्ली येथे देह व्यापार करणाऱ्या हनुमान टेकडी या भागात वेश्या गमन करून बाहेर आलेल्या दोघा व्यक्तीं पैकी एकाने हवेत गोळीबार करून दहशत माजवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघे फरार झालेआहे.मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान टेकडी परिसरात वेश्या गमन करण्यासाठी दोन तरुण आले होते.  एका कारमधून आलेल्या दोघा व्यक्तींनी एक महिलेसोबत वेश्यागमन केलं. त्यानंतर खोली बाहेर पडल्यावर कोणत्या तरी कारणावरून त्या दोघानं   पैकी एकाने गल्लीत उभे  राहत आपल्या जवळील रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी झाडीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली. सदरची व्यक्ती रस्त्यावर येऊन आपल्या कारजवळ आली असता जमलेल्या जमावाने त्यांच्या दिशेने दगडफेक केली असता त्यांनी तेथून पळ काढला. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत।
टिप्पणियाँ
Popular posts
नाप्ता साठवणुकीचा परवाना नसताना देखील मे. इंडियन ऑइल अदानी व्हेन्चर्स लिमिटेड या कंपनीचा नाप्ता साठवणुकीचा व्यवसाय चालू ?
चित्र
ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
कर्करोग निदान व्हॅन — ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चित्र
२०२५ " विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान!हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे, तर पत्रकारितेत निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक संघर्षशील पत्रकाराचा सन्मान आहे-डॉ. किशोर पाटील
चित्र