रोटरी क्लब ऑफ भिवंडी रॉयल्सचा पदग्रहण सोहळा संपन्न ; अध्यक्ष पदी राजू पाटील यांची नियुक्ती
भिवंडि १ ( राजेंद्र पाटील )
भिवंडी तालुक्यातील परशुराम धोंडू टावरे कोपर महाविद्यालय येथे मंगळवार रोटरी क्लब ऑफ भिवंडी राॅयल्सचा अध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्षपदी राजु पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांची ही नियुक्ती त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य व कला क्रीडा या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याने झाली असल्याचे सांगत येत आहे. रोटरी क्लब ऑफ भिवंडी रॉयल नवनिर्वाचित अध्यक्ष राजू पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले प्रचंड योगदान दिले आहे तसेच रोटरी क्लबच्या माध्यमातून देखील राजू पाटील समाजाच्या तळागळात जाऊन आपल्या कार्याची छाप सोडतील यात तिळमात्र शंका नसल्याचे मनोगत उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक गव्हर्नर रोटेरियन डॉ.संदीप कदम,रो.मिलिंद कुलकर्णी,डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रवींद्र पाटील,असिस्टंट गव्हर्नर प्रकाश म्हात्रे उपस्थित होते रोटरी.रोटेरियन राम घरत यांनी सुत्रसंचालकाची भुमीका पार पाडली.रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचे सोने करेन अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष राजू पाटील यांनी दिली.