दुगाड फाटा ते वावली रस्त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर
दुगाड फाटा ते वावली रस्त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर
 भिवंडी :(राजेंद्र पाटील )
भिवंडी तालुक्यातील दुगाड फाटा ते वावली या खराब झालेल्या रस्त्यासाठी एमएमआरडीए कडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सदर रस्ता काँक्रीटीकरणाचा होणार असल्याने येथील नागरिकांचा मोठा त्रास वाचणार आहे.
भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अस्नोली वावली मानिवली ते दुगाड फाटा या रस्त्याची जागोजागी खड्डे पडून खराब अवस्था झाली होती त्यामुळे परिसरातील नागरिक,विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे,आणि युवासेवा उपजिल्हाप्रमुख राजूभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे प्रभाकर पाटील यांनी सतत पाठपुरावा करून एमएमआरडीए क्षेत्रातील बाह्य रस्ते विकास योजनेअंतर्गत दुगाड फाटा ते वावली मानिवली या रस्त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत.त्यामुळे सदर रस्ता सिमेंट 
काँक्रीटीकरणाचा होणार आहे.यामुळे येथील नागरिकांची होणारी मोठी गैरसोय टळणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
टिप्पणियाँ
Popular posts
नाप्ता साठवणुकीचा परवाना नसताना देखील मे. इंडियन ऑइल अदानी व्हेन्चर्स लिमिटेड या कंपनीचा नाप्ता साठवणुकीचा व्यवसाय चालू ?
चित्र
ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
कर्करोग निदान व्हॅन — ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चित्र
२०२५ " विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान!हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे, तर पत्रकारितेत निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक संघर्षशील पत्रकाराचा सन्मान आहे-डॉ. किशोर पाटील
चित्र