मुंबई महापौरांना रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सभापती कुंदन पाटील यांनी दिले निवेदन
भिवंडी : मुंबई महानगरपालिका महापौर किशोरी पेडणेकर यांची जिल्हा परिषद ठाणे बांधकाम व आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील यांनी २९ जुन रोजी मंगळवारी सदिच्छा भेट घेतली दरम्यान भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातून जात असलेल्या मुंबई महापालिकेची पाण्याची पाईपलाईन त्याच्या बाजूने जात असलेल्या ताडाळी गाव ते काल्हेर चौकी पर्यंतचा खराब झालेल्या रस्ता दुरुस्त करण्याचे करण्याचे निवेदन देण्यात आले.येत्या आठ दिवसात निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.यावेळी तालुका सचिव दिपक पाटील,जय भगत,राजेंद्र काबाडी,संपर्क सचिव राजेंद्र पाटील,शिवसैनिक शेखर मामा फरमन,शाखा प्रमुख अनंता भामरे,मा.सरपंच पिंपळनेर फुलाजी इताडकर,समाजसेवक ज्ञानदेव पाटील,स्वीय्य सहाय्यक वैशाली नेहते उपस्थित होते.