भिवंडीतील भंडारी कंपाऊंड येथे दहीहंडी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणार - नगरसेवक श्री.यशवंत टावरे

भिवंडी (रमण पंडित) - दहीहंडी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात यंदाही कोरोनामुळे शुकशुकाट दिसणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या निर्णयामुळे तसेच उत्सव होणार नसल्याची आधीच कल्पना असल्यामुळे भिवंडी शहरातील गोविंदा पथकांनी नियमाचे पालन करून यंदाही दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रसंगी भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड येथील भाजपा नगरसेवक श्री.यशवंत टावरे प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, दरवर्षी लाखमोलाच्या दहीहंडीतील लोणी मटकावण्यासाठी अवघ्या शहरात गोविंदा, गोपाळ आणि गोपिकांचा जणू महासागरच लोटलेला असतो. परंतु कोरोनामुळे गेली दोन वर्षे या उत्सवात खंड पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याही वर्षी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय दिल्यामुळे भिवंडीतील मंडळांनी याही वर्षी सर्व नियमाचे पालन करून हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे सावट अजूनही गेलेला नाही. त्यामुळे यंदाही घागर उताणीच दिसणार आहे. तरी आम्ही दहीहंडी उत्सव सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करून अत्यंत साधेपणाने दहीहंडी बांधून तिची पूजा करून फोडली जाणार असल्याचे नगरसेवक श्री.यशवंत टावरे यांनी माध्यमांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र