भिवंडी (रमण पंडित)- देशाचा कारभार लोकाभिमुख असावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सोमवारपासून १६ ते २० ऑस्टपर्यंत पाच दिवसाची आपापल्या लोकसभा मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा काढून जनतेचे आशीर्वाद घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या यात्रेत भाजपाचे जिल्हास्तरीय व स्थानिक पातळीवरील नेतेही सहभागी होणार आहेत. भिवंडी शहरातील १९ ऑगस्ट रोजी सायं. ४. ०० वा. साईबाबा मंदिर बायपास येथून सुरु होऊन रात्री ९. ३० वाजता अंजूरफाटा येथे समारोप होणार आहे. तसेच ठिकठिकाणी मंदिरात दर्शन, पुतळ्यास पुष्पहार अर्पण व जनसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेळी माध्यमांशी संवाद साधून जिल्हा अध्यक्ष श्री. संतोष शेट्टी यांनी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद बैठक घेऊन माहिती दिली. या बैठकीत नगरसेवक श्याम अगरवाल, सुमित पाटील, ऍड हर्षल पाटील, प्रेषित जयवंत, विशाल पाठारे, महेंद्र गायकवाड, राजू गाजेगी, प्रसिद्धी प्रमुख पी.डी.यादव व अन्य मान्यवर उपस्तिथ होते.
भाजपा जिल्हा अध्यक्ष संतोष शेट्टी यांची पत्रकार परिषद ....