काल्हेर ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सौ.योगिता अनिल म्हात्रे यांची बिनविरोध निवड
गावाचे सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार - सौ.योगिता म्हात्रे .
रमण पंडित/महाराष्ट्र
भिवंडी :तालुक्यातील ग्रामपंचायत काल्हेर सरपंचपदी सौ.योगिता अनिल म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंचपदी निवड झाल्यानंतर सौ.योगिता म्हात्रे यांचा मावळत्या सरपंच आणि सर्व सन्माननीय सदस्य यानी पुष्पगुच्छ देऊन तसेच नगरसेवक श्री. नीलेश चौधरी, दिनेश पाटिल यानी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. काल्हेर ग्रामपंचायत सरपंचपदी निवड झाल्यानंतर सौ.योगिता म्हात्रे प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या की, मला मिळालेली संधि ही गावाचे सर्वागीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता जी कामे उर्वरित विकासाची कामे आहेत ती कामे पूर्ण करण्याचा संकल्प नवनिर्वाचित सरपंच सौ.योगिता म्हात्रे यानी सांगितले. सरपंच सौ.योगिता म्हात्रे या मनमिळाऊ स्वभावाच्या आहेत. त्या नेहमी हसतमुख चेहरा ठेऊन लोकांच्या समस्या जाणून घेणाऱ्या सरपंच म्हणुन त्यांचा लौकिक आहे. त्या निश्चित गावाच्या विकासासाठी स्तुत्य उपक्रम राबवून चांगले काम करतील अशी अपेक्षा आहे.