भिवंडी महापालिकेच्या वतीने स्वर्गीय आनंद दिघे चौकात सिग्नल यंत्रणा उद्घाटन महापौर प्रतिभा विलास पाटील यांचे शुभहस्ते संपन्न !
भिवंडी महापालिकेच्या वतीने स्वर्गीय आनंद दिघे चौकात सिग्नल यंत्रणा उद्घाटन महापौर प्रतिभा विलास पाटील यांचे शुभहस्ते संपन्न !
भिवंडी (रमण पंडित)- भिवंडी महापालिकेच्या वतीने स्वर्गीय आनंद दिघे चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच मा. महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी केले. या वेळेला वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, विद्युत अभियंता सुनील पाटील, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते. यावेळी महापौर प्रतिभा पाटील म्हणाल्या की, शहरात महानगरपालिकेच्या वतीने प्रथम तीन ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.त्यापैकी आनंद दिघे चौक आपण उद्घाटन करत आहोत. तर काही दिवसात राजीव गांधी चौक आणि भादवड नाका या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली तरी  नागरिकांनी, सर्व वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. सर्वांनी जर वाहतुकीचे नियम पाळले तरच वाहतूक वाहतुकीला शिस्त लागेल, वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही याकरिता वाहतूक शिस्त आवश्यक आहे, असे आवाहन देखील महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी केले.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र