उद्धवा अजब तुझे सरकार ! खुले करा हरिद्वार !!
भिवंडी (रमण पंडित)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरं बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात मंदिरं सुरु करण्यासाठी आज भाजपकडून शंखनाद आंदोलन सुरु आहे. महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील साहेबांच्या आदेशानुसार राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे, देवी देवतांना बंदिस्त करून लाखो गरिबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिर उघडण्याच्या इशारा देण्यासाठी भाजपा भिवंडीचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री श्री कपिल पाटील साहेब आणि आमदार श्री महेश चौघुले साहेबांच्या मार्गदर्शनखाली , भिवंडी भाजपा अध्यक्ष श्री. संतोष शेट्टी साहेबांच्या अध्यक्षतेखाली, भाजपा दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय आघाडी तर्फे वऱ्हाळा देवी मंदिर, कामतघर भिवंडी येथे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी भाजपा गटनेते हनुमान चौधरी, नगरसेवक श्याम अगरवाल, सरचिटणीस विशाल पाठारे, दक्षिण भारतीय आघाडी प्रमुख मोहन कोंडा, उत्तर भारतीय आघाडी प्रमुख प्रवीण मिश्रा, बिहार प्रकोष्ठ अध्यक्ष दीपक झा, मल्लेशम कोंका, निरंजन हेगडे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष ममता परमानी, युवा मोर्चा अध्यक्ष अनिल केसरवाणी, मंगेश यादव, कृष्णा हलवाई, अजित ठाकूर, मोहित सिंगल आदी पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते। भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भिवंडी वऱ्हाळा देवी मंदिर परिसरात एकत्र येत शंखनाद आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी देशासाठी, धर्मासाठी भाजप बोल बजरंगबली की जय, मंदिरांना बंदी, मदिरा विक्रीला संधी अजब हे सरकार, उघड दार उद्धवा, उघड दार उद्धवा यासारख्या घोषणा देत भाजपाने शंखनाद करून राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे. प्रत्येकाने मास्क व सामाजिक अंतरावरून हि आंदोलने सुरु केली. कोरोना कालावधीत महाराष्ट्र सरकारने (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस) नियमानुसार मॉंल, मद्य तयार केले आहे आणि राज्य सरकारने मंदिर, तीर्थक्षेत्रावर बंदी घातली आहे. तर केंद्र सरकारने नियमानुसार ते उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. महाराष्ट्र संत जमीन पृथ्वीवर मंदिरातील अभ्यागत करतात आणि मद्यपान करतात. मंदिरे खुली करा, भाविकांना दर्शनाचा लाभ घ्या, नियम बनवा, नियमाची अंमलबजावणी भाविक करतील आणि मंदिरे खुली करून जनतेला व भाविकांच्या भावना लक्षात घेऊन मंदिरे खुली करा असे आवाहन मोहन कोंडा यांनी माध्यमांशी बोलताना मनोगत व्यक्त केले.