धामणकर नाका मित्र मंडळ व स्वाभिमान सेवा संस्थाच्या वतीने संस्थापक श्री संतोष एम शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महारक्तदान शिबिराचे आयोजन
धामणकर नाका मित्र मंडळ व स्वाभिमान सेवा संस्थाच्या वतीने संस्थापक श्री संतोष एम शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महारक्तदान शिबिराचे आयोजन 
भिवंडी (रमण पंडित)- ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. कोरोनामुळे आपल्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे. अशातच राज्यात रक्ताचा तुटवडा देखील भासत आहे. शस्त्रक्रियांसह इतर उपचारांसाठी रक्ताची गरज भासू शकते. हा रक्ताचा तुटवडा भरून निघावा तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी भिवंडी येथील धामणकर नाका मित्र मंडळ व स्वाभिमान सेवा संस्थाच्या वतीने संस्थापक श्री संतोष एम शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ३३ वे वर्ष गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून या निमित्त दि १२ सप्टेंबर २०२१ रोजी धामणकर नाका येथे आयोजित रक्तदान शिबीराचे उदघाटन ठाणे विधानसभा आमदार संजयजी केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात भिवंडीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  रक्तदाता शोधणे व रक्ताचा गट जुळवणे हे अतिशय जिकिरीचे होते. या सर्वाना जीवनदान देण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.  तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनदान अर्पण करू शकतो. 
   या वेळी नगरसेवक निलेश चौधरी, महासचिव विशाल पाठारे, धामणकर नाका मित्र मंडळ अध्यक्ष व भाजपा कोषाध्यक्ष हसमुख पटेल, तिरुपती सिरिपूरम, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष प्रवीण मिश्रा, दक्षिण भारतीय मोर्चा अध्यक्ष मोहन कोंडा, सचिव ब्रिजेश पांडे, बालमुकुंद शुक्ला, मंडळ अध्यक्ष राजेंद्र वासम, भरत भाटी, विकास जैन, प्रवक्ता व धामणकर नाका मित्र मंडळ महासचिव मोहन बल्लेवार, रक्तदान शिबिर चे प्रमुख राकेश पटवारी, बाबूभाई पटेल, उत्तर भारतीय युवा मोर्चा अध्यक्ष अनिल केसरवानी, महिदीप चौहान, अजय राय, मंगेश यादव, कृष्णा हलवाई, सुनीता यादव, महासचिव अजित ठाकूर, रमण पंडित,  अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तसेच रक्तदात्यांना प्रमाण पत्र देण्यात आले.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र