वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री. मिथुन प्रभाकर पाटील यांची बिनविरोध निवड.
वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री. मिथुन प्रभाकर पाटील यांची बिनविरोध निवड!
गावाचे सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार - श्री.मिथुन पाटील 
भिवंडी (रमण पंडित)- भिवंडी तालुक्यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी वळ ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.दीपिका राजेश भोईर यांनी आपल्या पदाचा स्वखुशीने राजीनामा दिल्यामुळे सदर रिक्त झालेल्या पदासाठी अध्यासी अधिकारी तथा विद्यमान सरपंच श्री. राम एकनाथ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक श्री.अमोल कदम यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी श्री.मिथुन प्रभाकर पाटील यांचा एकच नामनिर्देशन पत्र आल्याने अध्यासी अधिकारी तथा सरपंच श्री.राम एकनाथ भोईर यांनी मिथुन पाटील यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर केले. तर सदर निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मावळत्या उपसरपंच सौ.दीपिका राजेश भोईर, सन्माननीय सदस्य गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी यांची देखील विशेष उपस्थिती होती. वळ ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर श्री. मिथुन प्रभाकर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मला मिळालेली संधि ही गावाचे सर्वागीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता जी कामे उर्वरित विकासाची कामे आहेत ती कामे पूर्ण करण्याचा संकल्प नवनिर्वाचित उपसरपंच श्री.मिथुन पाटील यांनी सांगितले. निश्चित गावाच्या विकासासाठी स्तुत्य उपक्रम राबवून चांगले काम होईल अशी अपेक्षा आहे. विकासाचे जे प्रलंबित कामे आहेत ते पूर्णपणे करण्याचा संकल्प नवनिर्वाचित उपसरपंच श्री. मिथुन पाटील यानी सांगितले.
         या प्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंच श्री.मिथुन पाटील यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, मा.सभापती सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, मा.सभापती, जि.प.सदस्य कुंदन पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रभुदास नाईक, शेतकरी उन्नती मंडळाचे अध्यक्ष राजू पाटील, भाजपचे नेते हरिश्चंद्र भोईर, रामदास भोईर, वसंत भोईर, चंद्रकांत भोईर, पंचायत समितीचे माजी सभापती विकास अनंत भोईर, गुंदवली गावचे उपसरपंच सुमित सुरेश म्हात्रे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख चक्रधारी पाटील, वळ शाखा प्रमुख अनंता भामरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र