धामणकर नाका मित्र मंडळ व स्वाभिमान सेवा संस्थाच्या वतीने संस्थापक श्री संतोष एम शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली मोफत महा नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद
भिवंडी : भिवंडी येथील धामणकर नाका मित्र मंडळ व स्वाभिमान सेवा संस्थाच्या वतीने संस्थापक श्री संतोष एम शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली ३३ वे वर्ष गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून या निमित्त १५ सप्टेंबर २०२१ रोजी सांय.०४.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत धामणकर नाका येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गरीब व गरजू लोकांना मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन केले जाईल. तसेच श्री भैरव चेरिटेबल आय हॉस्पिटल भिवंडी यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिरात महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. धामणकर नाका येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन मा. राज्यमंत्री व पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य, डोंबिवली विधानसभा आमदार श्री. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा नगरसेवक श्याम अगरवाल, भाजपा गटनेते हनुमान चौधरी आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात भिवंडीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.