कोनगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी शिवसेनेचे श्री. राजेश मुकादम यांची बिनविरोध निवड गावाचे सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार - श्री. राजेश मुकादम
कोनगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी शिवसेनेचे श्री. राजेश मुकादम यांची बिनविरोध निवड 
गावाचे सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार - श्री. राजेश मुकादम 
भिवंडी (रमण पंडित)- भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत कोनगाव उपसरपंचपदी श्री. राजेश मुकादम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर सरपंच आणि सर्व सन्माननीय सदस्य यानी पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कोनगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर श्री. राजेश मुकादम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, मला मिळालेली संधि ही गावाचे सर्वागीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता जी कामे उर्वरित विकासाची कामे आहेत ती कामे पूर्ण करण्याचा संकल्प नवनिर्वाचित उपसरपंच श्री. राजेश मुकादम यानी सांगितले. निश्चित गावाच्या विकासासाठी स्तुत्य उपक्रम राबवून चांगले काम होईल अशी अपेक्षा आहे. मतदारांनी जो माझ्यावर विश्वास दाखविला त्यांचे शतशः ऋणी आहोत. विकासाचे जे प्रलंबित कामे आहेत ते पूर्णपणे करण्याचा संकल्प नवनिर्वाचित उपसरपंच श्री. राजेश मुकादम यानी सांगितले. कोन ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व असून मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी युती असल्यामुळे आपसांत ठरलेल्या समझोत्यामुळे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, प्रकाश पाटील आणि विश्वास थळे यांच्या आदेशाने उपसरपंच पदावर राजेश मुकादम यांची निवड झाली. विद्यमान सरपंच डॉक्टर रुपाली कराळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेली उपसरपंच निवड संपन्न झाली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विश्वास थळे, उपतालुका प्रमुख राकेश म्हात्रे, मा. सरपंच हरेश म्हात्रे, भाजपाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद पाटील, चंद्रकांत पाटील, भरत जाधव, अशोक म्हात्रे, सुनील म्हात्रे, पंढरी भोईर, डॉक्टर अमोल कराळे, पंचायत सदस्य शीला राखाडे, प्रल्हाद राखाडे आदी उपस्तिथ होते.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र