वॉर्ड क्र.१६ मधील समाजसेवक तथा अध्यक्ष मांग गारुडी समाज युवा परिवर्तन सेवा संस्था श्री.दीपक लोंढे यांच्या दिनेश वेज चायनीज सेंटरचे उद्घाटन संपन्न
भिवंडी (रमण पंडित)- भिवंडी वॉर्ड क्र.१६ चे नगरसेवक श्री. नित्यानंद नाडार (वासू अण्णा) यांच्या हस्ते पदमानगर दिनेश चायनीज सेंटर, गणेश टॉकीज येथे उदघाटन संपन्न करण्यात आला. दीपक लोंढे यांनी नगरसेवक श्री वासू अण्णा यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. सोबत समाजसेवक कनकवेल अण्णा, हरेश ठक्कर, सौ.ममता परमानी (भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा) यांचा ही शाल व श्रीफळ देऊन दीपक लोंढे यांनी सन्मान केला. सोबत मुकेश सिंह, अजय वरकुटे, महाराजन नाडार ,समीर पटेल, सदाशिव पेरला व कार्यकर्ता उपस्थित होते. नगरसेवक श्री. वासू अण्णासह वरील उपस्थित मान्यवरांनी दीपक लोंढे यांना पुढील उज्ज्वल व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.