भिवंडी (रमण पंडित)- भिवंडी मानसरोवर येथील नगरसेवक श्याम अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नाने गटाराचे काम सुरु करण्यात आले. भिवंडी महानगरपालिके अंतर्गत सर्वसाधारण निधीतून गटारीचे काम सुरू करण्यात आले. पूर्वी बनवलेले गटारे पूर्णपणे जीर्ण झाले होते. पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा स्थितीत गटार बांधणे अत्यंत गरजेचे होते, या भागात गटार बांधल्यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांना दिलासा मिळेल. यानंतर येणाऱ्यांसाठी एक साधा आणि सुंदर मार्गही उपलब्ध होईल. या योजने अंतर्गत प्रभागातील नागरिकांना पाणी साठण्यासारख्या परिस्थितीतून दिलासा मिळणार आहे. नगरसेवक श्याम अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे गटारी न बांधल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता नागरिकांना या समस्येपासून लवकरात लवकर सुटका मिळेल.
भिवंडी मानसरोवर येथील नगरसेवक श्याम अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नाने गटाराचे कार्य सुरु
• भगवानदास विश्वकर्मा (सहारा सिटी न्यूज)