राजकीय क्षेत्रात उंच भरारी घेणारं उमदं आक्रमक नेतृत्व भाजपा डॅशिंग नगरसेवक सुमित दादा पाटील यांचा वाढदिवस उत्साही वातावरणात साजरा
राजकीय क्षेत्रात उंच भरारी घेणारं उमदं आक्रमक नेतृत्व भाजपा डॅशिंग नगरसेवक सुमित दादा पाटील यांचा वाढदिवस उत्साही वातावरणात साजरा 
भिवंडी (रमण पंडित)- भिवंडी शहरातील डॅशिंग आक्रमक बाणा असलेले भाजपचे नगरसेवक, उपाध्यक्ष भाजपा भिवंडी शहर जिल्हा, स्थायी समिती सदस्य श्री सुमित दादा पाटील यांची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारं, भिवंडी महापालिकेतील पद्मानगर परिसरातील भाजपा नगरसेवक श्री. सुमित पाटील यांचा वाढदिवस आमदार श्री. महेश चौगुले, भाजपा भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष श्री. संतोष शेट्टी, नगरसेवक
श्री. निलेश चौधरी, नगरसेवक श्याम अगरवाल, नगरसेवक नित्यानंद नाडर उर्फ वासू अण्णा, भाजपा महिला अध्यक्ष ममता परमानी, आर. पी. आय. अध्यक्ष महेंद्र गायकवाड, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष श्री. प्रवीण मिश्रा, भाजपा उत्तर भारतीय महिला मोर्चा सुनीता यादव, युवा मोर्चा अध्यक्ष अनिल केसरवानी, आदी नगरसेवक, नगरसेविका, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र परिवार, आप्तेष्ट नातेवाईक यांचे उपस्तिथीत शाल व पुष्पगुच्छ देऊन केक कापून उत्साही वातावरणात वाढदीवस साजरा करण्यात आला. सुमित पाटील यांच्या वाढदीवसानिमित्त गुडहर्ट हेल्थ केअर, विमला डोळ्याचे हॉस्पिटल, भिवंडी ब्लड बँक यांच्या सौजन्यांने फ्री मेडीकल शिबीर व धान्य वाटप कार्यक्रम कामतघर फेणेगाव येथे आयोजक श्री. विठोबा बिल्ला नाईक, नितेश ऐनकर, मयूर चौधरी, अंबादास सिंघम, संगीत
नाईक, नरेश दायमा, श्री रमणी मित्र मंडळ व राजे ग्रुप यांच्यावतीने करण्यात आला. तसेच पद्मानगर येथे कपिल पाटील फॉउंडेशन, अखिल पद्मशाली समाज व एकता सामाजिक सेवा संस्था भिवंडी यांच्या सहकार्याने सुमित पाटील यांच्या वाढदीवसानिमित्त मोफत आरोग्य मेळावा करण्यात आला. तसेच श्रीरंगनगर येथे नगरसेवक श्री. नित्यानंद नाडर यांनी वासू अण्णा फॉउंडेशन आयोजित सुमित दादा पाटील यांच्या वाढदीवसानिमित्त विनायकम मल्टीस्पेसिलिस्ट हॉस्पिटल सौजन्याने फ्री मेडिकल शिबीर कार्यक्रम करण्यात आला. तसेच मानसरोवर व फुलेनगर संघर्ष समिती यांच्या सौजन्यांने  सुमित पाटील यांच्या वाढदीवसानिमित्त फ्री मेडीकल शिबीराचे आयोजक पिंटू शेलार यांच्यावतीने करण्यात आला. येथील भिवंडी शहरात आणि ग्रामीण भागात असे विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
      सुमित दादा पाटील यांनी लॉकडाउन संक्रमण काळात दररोज परप्रांतीय कष्टकरी गरीब मजुरांना दोन वेळचे भोजन दिले जात होते. एकंदरीत कोरोना महामारीत गरीब कष्टकरी लोकांचे प्रचंड हाल झाले होते.  या हलाखीत सुमित दादा पाटील यांनी गरिबांची कष्टकऱ्यांची निस्वार्थपणे सेवा केली. सुमित पाटील यांचे नेतृत्वाखाली पद्मानगर परिसरातील त्यांचे प्रभागातील विकासाची भरीव कामे झाली आहेत. कामाच्या बाबतीत सुमित पाटील यांचा आवाका मोठा आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ते नेहमी गरीब कष्टकरी कामगार वर्गात मिसळत असतात आणि त्यांच्या समस्या जाणून घेतात. त्यांना शालेय मदत असो, रुग्णांसाठी मदत असो, विध्यार्थ्यांसाठी फी भरण्याचा प्रश्न असो, बेरोजगार युवकांचा प्रश्न असो, आपले प्रभागातील पाण्याची समस्या असो, स्वच्छता अभियानाचा प्रश्न असो या सर्व प्रश्नात स्वतः जातीने आपल्या टीमसह मैदानात उतरत असतात आणि या सर्वाना तन-मन-धन अर्पण करून गरिबांची सेवा करत असतात. जे संकटात मदत करतात त्यांनाच जनता डोक्यावर घेते आणि जनसेवेची संधी देते. आज जे आपण आहोत ते कार्यकर्तेमुळेच, हे लक्षात ठेवा आणि पुढे यशस्वी होत रहा. सुमित पाटील यांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांचे हातून समाजाची उत्तरोत्तर चांगली सेवा घडो, त्यांचे समाजकारणासह राजकारणातील भविष्यातील स्थान मजबूत होवो.
टिप्पणियाँ
Popular posts
नाप्ता साठवणुकीचा परवाना नसताना देखील मे. इंडियन ऑइल अदानी व्हेन्चर्स लिमिटेड या कंपनीचा नाप्ता साठवणुकीचा व्यवसाय चालू ?
चित्र
ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
कर्करोग निदान व्हॅन — ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चित्र
२०२५ " विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान!हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे, तर पत्रकारितेत निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक संघर्षशील पत्रकाराचा सन्मान आहे-डॉ. किशोर पाटील
चित्र