भिवंडी पदमानगर येथे युवा इंडियन फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन
भिवंडी पदमानगर येथे युवा इंडियन फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन 
भिवंडी (रमण पंडित)- कोरोना
रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा देखील भासत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना रक्ताचा पुरवठा होणं देखील कठीण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर अखिल पद्मशाली समाज हाल, पदमानगर येथे सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत युवा इंडियन फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबीरात विविध सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील मंडळींनी शिबिरात सहभाग नोंदविला एवढेच नव्हे तर महिला मंडळींनी सुद्धा रक्तदान केले. अनेक जागरूक नागरिकांनी यात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसून आले. युवा इंडियन फॉउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश शेट्टी, उपाध्यक्ष विनोद सिरीसिला, खजिनदार नवल चौरसिया यांच्यावतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे युवा इंडियन फॉउंडेशन गेल्या ११ वर्षांपासून अखंडपणे ही परंपरा सुरु आहे. रक्तपुरवठा करणाऱ्या कल्याण येथे संकल्प ब्लड बँकेकडे हे रक्त जमा करण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे कोरोना व्हायरसच्या सर्व नियमांचे पालन करत २०० हून अधिक रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. यामध्ये लायन क्लब ऑफ भिवंडीचे अध्यक्ष शीतल देशमुख, लिओ क्लब ऑफ भिवंडीचे अध्यक्ष स्नेहा अडेप यांचा मोठा सहभाग होता.
टिप्पणियाँ
Popular posts
नाप्ता साठवणुकीचा परवाना नसताना देखील मे. इंडियन ऑइल अदानी व्हेन्चर्स लिमिटेड या कंपनीचा नाप्ता साठवणुकीचा व्यवसाय चालू ?
चित्र
ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
कर्करोग निदान व्हॅन — ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चित्र
२०२५ " विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान!हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे, तर पत्रकारितेत निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक संघर्षशील पत्रकाराचा सन्मान आहे-डॉ. किशोर पाटील
चित्र