भिवंडी पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या नमिता निलेश गुरव यांची बिनविरोध विजयी

भिवंडी पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या नमिता निलेश गुरव यांची बिनविरोध विजयी  

 भिवंडी प्रतिनिधी परवीन खान 

भिवंडी :पंचायत सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नमिता निलेश गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
          42 सदस्य असलेल्या भिवंडी पंचायत समितीत शिवसेना 20 ,भाजपा 19, काँग्रेस 2 ,मनसे 1असे पक्षीय बलाबल असून शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या स्थानिक पातळीवर झालेल्या समझोत्या नुसार मागील दीड वर्षां पासून सभापती व उपसभापती पदावर आलटून पालटून दोन दोन महिन्यां करीता शिवसेना भाजपा लोकप्रतिनिधींना संधी दिली जात असून सभापती पदी असलेले शिवसेनेचे रविकांत पाटील यांनी आपापसात ठरल्या प्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या निवडी करीता विशेष सभेचे आयोजन तहसीलदार तथा पिठासन अधिकारी अधिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेत सभापती पदासाठी भाजपाच्या सदस्य निमिता गुरव यांचा   एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली .या निवडी नंतर सर्व पंचायत समिती सदस्यांसह अनेक हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र