भावबीज निमित्त सगळ्या प्रेमळ भावांसाठी
भावबीज निमित्त सगळ्या प्रेमळ भावांसाठी
*भाऊस तो भाऊस आसते*
    ( आगरी कविता )

लुगरा असो क सारी
हालकी असो क भारी,
भावबीजला आवदा क क नेवाचा
याचा तो आगोदरच पलान रचते !
*शेवटी कई पन बोला*...
*भाऊस तो भाऊस आसते !*

बारीक पनापासून दोगांचा
भांडल्या शिवाय जमत नी,
ना बनीस जवल नसल्याव
त्याला शन भ पन करमत नी !
तिचे हाता पायाला जरासा खरचाटला
त याचेच जीवाला कालजी भासते !
*शेवटी कई पन बोला.*..
*भाऊस तो भाऊस आसते !*

बनीसचा लगीन जमवाला
घरान याचाच म्होठा वाटा !
आपले बाय चा चंगला व्हवा
याचेचसाठी त्याचा आटापीटा !
ताईची वरात घरानशा निगली
क एकटाच कोपऱ्यान लरत बसते !
*शेवटी कई पन बोला..*.
*भाऊस तो भाऊस आसते !*

संपत्तीचे हिस्स्या वाट्यासाठी
जरी आसल रुसारुशी !
राखी पुनवचे दिवशी
ती येते धावत तशी बीशी !
याचं पन डोलं लागलेलं आसतान
बाय ईकरं दिसते क तिकरं दिसते !
*शेवटी कई पन बोला...*
*भाऊस तो भाऊस आसते !*

पगार याचा तुटपुंजा
किशान नसली जरी दिरकी !
जीवाचं रान करील भावबीजसाठी
नाराज नी झली पजे बनीस लारकी !
दोन-चार बनीशी आसल्या तरी
त्याला खरचाची परवा नसते !
*शेवटी कई पन बोला.*..
*भाऊस तो भाऊस आसते !*

*शब्दयोगी संगते*....
असाच म्होठे-बारके भावाचा पिरेम
परत्येकीला हक्काशा भेटू दे !
राग रुसवा जपून सुधा
भावा बयनीची माया जगाला पटु दे !
बनीसची पोराटारा,संसार सुखी
त मामा पन मनानचे मनान हासते !
*शेवटी कई पन बोला...*
*भाऊस तो भाऊस आसते !*

*कवी* - *प्रा- योगेश हरीचंद्र चिकणे.*
मु- वडुनवघर 
ता-भिवंडी,जि- ठाणे,


टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र