भिवंडी : ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील शेलार गावात राहणारे पंकज अशोक गायकवाड यांची काँग्रेस ठाणे जिल्हा (ग्रामीण ) महासचिव पदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी पुन्हा नियुक्ती केल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवंचैत्यन्य निर्माण झाले असून काँग्रेस वाढीसाठी चांगलीच मदत होईल अशी अपेक्षा काँग्रेसचे पदाधिकारी करीत आहे, पंकज गायकवाड त्यांच्या मातोश्री विजया अशोक गायकवाड ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या असून त्यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याने त्यांच्या मागे चांगला जनाधार आहे पंकज गायकवाड यांच्या नियुक्ती झाल्याने बहुजन विकास आघाडीचे पालघरचे सचिव दिलीप गायकवाड, काँग्रेस तालुका युवा अध्यक्ष निलेश भोईर, भिवंडी शहर युवा अध्यक्ष अरफात शेख, माजी ठाणे जिल्हा सचिव मुदतशीर पटेल, भिवंडी शहर सचिव सत्यराम चिपा, समाजसेवक रतन चव्हाण,विजय गायकवाड, संजय जाधव, रवि जाधव,पत्रकार आकाश गायकवाड, आशा अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी पंकज गायकवाड यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून यावेळी पंकज गायकवाड यांनी आमचे खंबीर नेतृत्व असलेले काँग्रेसचे ठाणे जिल्हा (ग्रामीण ) अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या मारदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्यासाठी मी सैदव तत्पर असून लवकरच विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील त्याच प्रमाणे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती पंकज गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे..
काँग्रेस ठाणे जिल्हा महासचिव पदी पंकज गायकवाड यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी पुन्हा केली नियुक्ती