दापोडे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचपदी सौ. अपर्णा मणिलाल पाटील यांची बिनविरोध निवड !गावाचे सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार - सौ. अपर्णा पाटील
दापोडे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचपदी सौ. अपर्णा मणिलाल पाटील यांची बिनविरोध निवड !
गावाचे सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार - सौ. अपर्णा पाटील 
भिवंडी :भिवंडी तालुक्यातील दापोडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री. चिंतामण पाटील यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा सहखुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी तहसीलदार श्री. अधिक पाटील यांच्या आदेशाने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा अध्यासी अधिकारी श्री. राजू भगवान भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक श्री.चंद्रकांत धर्मा बुटेरे यांच्या खास उपस्थितीत बुधवार दि. १-१२-२०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालय दापोडे येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली. सदर निवडणुकीत सरपंच पदासाठी सौ.अपर्णा मणिलाल पाटील यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी श्री. राजू भगवान भोसले यांनी जाहीर केले. त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी उपस्तिथ होते. मला मिळालेली संधि ही गावाचे सर्वागीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता जी कामे उर्वरित विकासाची कामे आहेत ती कामे पूर्ण करण्याचा संकल्प नवनिर्वाचित सरपंच सौ.अपर्णा मणिलाल पाटील यांनी सांगितले. निश्चित गावाच्या विकासासाठी स्तुत्य उपक्रम राबवून चांगले काम होईल अशी अपेक्षा आहे. विकासाचे जे प्रलंबित कामे आहेत ते पूर्णपणे करण्याचा संकल्प नवनिर्वाचित  सरपंच सौ.अपर्णा मणिलाल पाटील यांनी शेवटी सांगितले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक श्री. दुर्बन पाटील यांनी केले.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र