गावाचे सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार - सौ. सोनाली चौधरी
भिवंडी -भिवंडी तालुक्यातील सरवली ग्रामपंचायत ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत आहे. नुकताच पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत ग्राम विकास एकता परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून सौ.सोनाली जयहिंद चौधरी यांचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीत सोनाली चौधरी यांना १० मते मिळाली तर प्रतिस्पर्धी नीलम दिनेश पाटील यांना ५ मते मिळाल्याने चौधरी यांचा विजय झाला. सरपंच निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी इंद्रजीत काळे यांनी कामकाज पाहिले? सरपंच सोनाली चौधरी यांच्या विजयानंतर मिरवणुकीसह गुलाल उधळत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी ठाणे ग्रामीण काँग्रेस दयानंद चोरघे, युवा नेते विनोद ठाकरे, सचिन ठाकरे, गोपीनाथ चौधरी, तुळशीराम पाटील, गणेश चौधरी, मुकुंद चौधरी, रमेश पाटील, बबन पाटील, दिलीप चौधरी, किशोर चौधरी, परेश चौधरी, शरद चौधरी यांनी नवनिर्वाचित सरपंच सोनाली चौधरी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.