पनवेल (प्रतिनिधी) - अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे पनवेल तालुकाध्यक्ष कु.राज शरद भोईर यांच्या पुढाकाराने टेंभोडे, पनवेल येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
रक्कम रुपये *१ लाख ४४ हजार ४४४* रुपयांची बक्षिसे असलेली *दहीहंडी* टेंभोडे गावात पहील्यांदाच आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. डॉ. रमेश सावंत, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस मा.अण्णासाहेब पंडित, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे कोकण प्रदेश अध्यक्ष मा.संतोष चाळके,अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष दिनेश भालेराव ,पनवेल महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती सभापती नगरसेवक प्रवीणशेठ पाटील, भूपेंद्रसिंग बडगुजरा पत्रकार संघ महाराष्ट्र सम्पर्क प्रमुख, खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. सुभाष कोकाटे, क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन अध्यक्ष सौ रुपालीताई शिंदे, कृष्णा पाटील माजी सरपंच. पडघे गाव, प्रकाश म्हात्रे समाजसेवक,वळवली,दशरथ म्हात्रे असुडगाव, सुभाष भोईर., अॅड. अजित चव्हाण अंकुश म्हस्कर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमुख अतिथींचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी उपस्थिती लावुन सलामी दिली. त्यांचाही पाहुण्यांच्या व आयोजकांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व योग्य ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
०००४ ग्रुप चे सर्व सदस्य व टेंभोडे व इतर गावातील ग्रामस्थांनी दहीहंडी उत्सवाचे कार्यक्रमात सहभाग नोंदविला. सदर मानची दहीहंडी खिडूकपाडा, पनवेल येथील गोविंदा पथकाने फोडली. त्यांना मान्यवर अतिथींच्या हस्ते मानाची ट्रॉफी तसेच बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे तसेच प्रदेश-सरचिटणीस अण्णासाहेब पंडीत, कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. टेंभोडे गावात पहिल्यांदाच इतका शिस्तबद्ध कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पंचक्रोशीतील मान्यवरांकडून आयोजकांचे व अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या सामाजिक कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.