केंद्रीय पंचायत राज मंत्री यांनी भिवंडी शहरात होणाऱ्या नवीन विकास आराखडा याचा घेतला आढावा, शहराच्या चेहरामोहरा कसा बदलेल याचा प्रयत्न करावा….कपिल पाटील

केंद्रीय पंचायत राज मंत्री यांनी भिवंडी शहरात होणाऱ्या नवीन विकास आराखडा याचा घेतला आढावा, शहराच्या चेहरामोहरा कसा बदलेल याचा प्रयत्न करावा….कपिल पाटील

भिवंडी : शहरातील सुधारित नवीन विकास आराखडा याचे काम चालू आहे या कामांचा आढावा पालिकेत आज केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी घेतला. यावेळी मंत्री महोदय यांनी नवीन सुधारित विकास काम करताना भविष्यात पुढील 20 वर्ष याचा विचार करून आराखडा तयार करावा. आरक्षणा विकसित करण्याकरता गरजेचे भूसंपादन विस्थापित लोकांचे पुनर्वसन करणे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्याकरता मोठ्या मैदानाची आवश्यकता शासनाच्या निर्देशानुसार विविध उपाय योजना बनवणे याकामी जागा उपलब्ध करणे, टी डी आर महत्व वाढविणे, शहराबाहेर टी. डी.आर वापरता येईल का,आंतर राष्ट्रीय खेळाडू यांचेकरिता क्रीडा संकुल, मोठे वाचनालय, मल्टी सपशेल हॉस्पिटल,
यामध्ये भिवंडी शहरातील सुधारित विकास योजनेची प्रश्नावली तयार करून घरोघरी देऊन सामान्य नागरिकांचा सूचना याचां प्राधान्याने विचार करावा, विकास काम करताना शहराची जुनी दाटीवाटीचे शहर ओळख पुसून नवीन ओळख निर्माण झाली पाहिजे.
वरालदेवी तलाव सुशोभीकरण, तसेच त्या ठिकाणी अद्यावत मीनाताई ठाकरे नाट्यगृह स्थलांतरित करणे, चांगल हॉस्पिटल, उद्यान, शहरा जवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण, outer ring road , शहराचा सर्वांगीण विकास हे अपेक्षित आहे. नवीन विकासक शहरात येणे अपेक्षित आहे.शहराचा विकास ही भविष्याची ओळख असली पाहिजे अशी अपेक्षा केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी केल्या. यावेळी पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, स्मिता कलकुटकी सहायक संचालक विशेष विकास योजना घटक प्रकल्प, अनिल येळमाने नगररचनाकार , शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, अन्य अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र