शहापुरात पत्रकार दिन उत्साहात साजरा, लवकरच होणार पत्रकार महासंघाची स्थापना ।


        शहापूर प्रतिनिधी / सोमनाथ शिर्के                                                       
                              आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षी 6 जानेवारी रोजी राज्यात पत्रकार दिन साजरा केला जातो, आज दिनांक 6 जानेवारी रोजी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून संघर्ष पत्रकार संघांचे अध्यक्ष व पुण्यनगरी पेपरचे पत्रकार योगेश हजारे व ग्रामीण पत्रकार संघांचे तालुकाध्यक्ष,पुढारी पेपरचे पत्रकार जितेंद्र भानुशाली यांच्या पुढाकाराने पत्रकार दिन व स्नेह भोजन कार्यक्रमाचे आयोजन सावरोली येथील बाळाराम पाटील फार्म येथे करण्यात आले होते,या कार्यक्रमात शहापूर तालुका पत्रकार फेडरेशन तयार करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली, लवकरच महासंघाची स्थापना करण्यात येणार आहे,कार्यक्रमाला उपस्थित पत्रकारांना ज्येष्ठ पत्रकार महेश धानके यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले,त्यांचबरोबर अनिल शेट्ये, वामन केदार, रविंद्र सोनवणे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले,या छोटेखानी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला तालुक्यातून जवळ-जवळ पन्नास पत्रकार उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत फेडरेशन करण्या संदर्भात जी चर्चा झाली त्या चर्चेत पत्रकार अनिल घोडविंदे, राजेश जागरे, संतोष दवणे, किशोर शेळवले, उमेश जोशी,काळूराम भोईर, मनोहर पाटोळे, सोमनाथ शिर्के यासह काही पत्रकारांनी महत्वपूर्ण सूचना केल्या, कार्यक्रमा दरम्यान शहापूर तालुक्याचे आमदार दौलत दरोडा यांनी कार्यक्रम स्थळी पत्रकारांना भेट देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या व लवकरच जागा  उपलब्ध झाल्यास पत्रकार भवन बांधून देण्याचे आश्वासन दिले, या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार योगेश हजारे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत भडांगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत गडगे यांनी केले, या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधव उपस्थित होते..
टिप्पणियाँ
Popular posts
नाप्ता साठवणुकीचा परवाना नसताना देखील मे. इंडियन ऑइल अदानी व्हेन्चर्स लिमिटेड या कंपनीचा नाप्ता साठवणुकीचा व्यवसाय चालू ?
चित्र
ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
कर्करोग निदान व्हॅन — ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चित्र
२०२५ " विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान!हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे, तर पत्रकारितेत निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक संघर्षशील पत्रकाराचा सन्मान आहे-डॉ. किशोर पाटील
चित्र