आंबेटेंभे मुरबाड या गावी " भिमाई स्मारकाचे भूमिपूजन
 ठाणे: मा.दादासाहेब खरे मा प्रियाताई खरे "प्रमोदजी जाधव "अभिमन्यू भालेराव यांच्या अथक परिश्रमातून साकारण्यात येणाऱ्या राजमाता भिमाई यांच्या १६९ व्या जयंती निमित्त त्यांच्या आंबेटेंभे मुरबाड या गावी " भिमाई स्मारकाचे भूमिपूजन माननीय नामदार डॉ. रामदासजी आठवले साहेब"केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले .सदर कार्यक्रमास आरपीआयच्या दिग्गज नेते व ज्येष्ठ कार्यकर्त्यां च्या समावेशा सह ठाणे जिल्हा आरपीआय महिला आघाडी अध्यक्षा संगीताताई राजेश गायकवाड. आरपीआयचे ज्येष्ठ नेते तथा सरचिटणीस पॅंथर बाळासाहेब भालेराव "ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्षा रूपाली जयंत कुलकर्णी. धडाडीच्या क्रियाशील ठाणे जिल्हा महिला सदस्या "सुवर्ण रमेश नाईक. शहापूर तालुका अध्यक्ष जयवंतजी थोरात. शहापूर तालुका महिला आघाडी अध्यक्षा आरतीताई भोईर. मुरबाड तालुका अध्यक्षा सुरेखाताई खोळंबे. नाट्य लेखक साहित्यिक राजेश गायकवाड आदी मान्यवर भूमिपूजन कार्यक्रमास व भिमाई स्मारकास अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. सदर कार्यक्रम सांगता झालेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे साहेब यांना राष्ट्रपती पदक मिळाल्यामुळे त्यांचा तसेच कुमार. अरहंत प्रमोद जाधव यांना  गोल्ड मेडल मिळाले मुळे त्यांचे अभिनंदन व सत्कार ज्येष्ठ नेते जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भालेराव व ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा संगीताताई राजेश गायकवाड यांचे वतीने करण्यात आला. भिमाई स्मारकास अभिवादन करण्यासाठी तालुक्यातून व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. मा ना रामदासजी आठवले साहेब"केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या शुभ  हस्ते  सेवाभावी कार्याबद्दल अनेक मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला.
टिप्पणियाँ
Popular posts
जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ मार्गदर्शन कार्यशाळा
चित्र
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे अभिवादन कार्यक्रम
चित्र
नवजात बाळांच्या स्वागतासाठी आगळीवेगळी संकल्पना; 'इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स' कडून पर्यावरण रक्षणाचा संदेश
चित्र
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची पाच वर्षे पूर्ण; समावेशित शिक्षणासाठी विशेष वैद्यकीय तपासणी शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे यशस्वीपणे संपन्न
जिल्हा परिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात
चित्र